मुंबईत दुचाकी वाहनांसाठी ‘MH01FH’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती जाहिर

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या दुचाकी खासगी परिवहनेत्तर (2W NT) वाहनांसाठी वापरात असलेली ‘MH01FG’ ही नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता ‘MH01FH’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निखील साळुंखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारित नियम 54 (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचे किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी कार्यालयाने निश्चित केलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांपर्यंत असते आणि या कालावधीत त्या क्रमांकावर वाहनाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई १८ येथे अर्ज उपलब्ध असून मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरक्षणाची नोंद ‘वाहन-04’ प्रणालीमध्ये केल्यानंतर संबंधित वाहनास आरक्षित क्रमांक दिला जातो.

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

नवीन ‘MH01FH’ मालिकेतील पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई-१८ येथे अर्ज व शुल्क जमा करावे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीने क्रमांक वितरित करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *