उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील  जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना दरम्यान, मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे, मतदारांना अपात्र ठरविणे आदी गोष्टी केल्या. त्यामुळे देशातील अनेक जवळपास कोट्यावधी मतदारांना निवडणूकीच्या काळात मतदानापासून रहावे लागले. त्यातच इंग्रजी वर्तमान पत्र इंडियन एक्सप्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर आयुक्तांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. तसेच देशात एकच खळबळ उडाली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकेचा भडीमार करत त्यांच्या मनमानीवर आज शिक्कामोर्तब झाल्याची टीका केली.

उद्धव ठाकरे टीका करताना पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची मनमानी सुरु होती, याची आज पुष्टी झाली. पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार हे ज्ञानेश कुमार आहेत. आज ज्ञानेश कुमार यांचा विद्रुप चेहरा समोर आला. तातडीने ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मागील काही वर्षापासून आम्ही सर्व विरोधक निवडणूक आयोगाच्या किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानी चालनाऱ्या कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. पण ते आज खरं होताना दिसत आहे.आज ज्याला खरं बंड म्हणतात, निवडणूक आयोग हा दोन आयुक्तांचा झाला. त्यामुळे दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आयोगातून काढलं आहे असं मानायला हरकत नाही. कारण या दोन आयुक्तांचे बहुमत झालं असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतात एक टोळी हैदोस घालत आहे. ही टोळी राजकीय पक्ष फोडणे, दुसऱ्यांचे पक्ष चोरणे, लोकशाहीचा खून करणं अशीही टोळी कारभार करत आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार हा निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती असा सवाल करत हे लोकांना आता कळलं आहे. असं बोललं जात आहे की, केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचना मानतो, मग याचे सुत्रधार गृहमंत्री आहे का असा सवाल करत याचाही खुलासा झाला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *