भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव

मुंबईः प्रतिनिधी
अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंत्रिमंडळातील महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री बाळा भेगडे, जनसंधारण मंत्री राम शिंदे या भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर यांचाही पराभव या निवडणूकीत झाला. याबरोबरच कृषीमंत्री अनिल बोंडे, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदीवासी राज्यमंत्री परिणय फुके आदी मंत्रीही पराभूत झाले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर विकास म्हणजे नक्की काय? दोन मजलेवरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार. शेतकऱ्यांचा यात काय फायदा?

पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.‌ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *