राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पुढे बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण बियाणा व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणे हे शासनाचे उद्दिष्ट
राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी व विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत (SOP) बदल करून …
Read More »शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर सन २०२६-२७ मधील नियमित …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, दापचरीत ५५८ हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार वाढवण बंदराजवळ उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर (१,३९५ एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना दापचरी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय …
Read More »देशातील सर्वात मोठे ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपूर्वी नोंदणी करा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीस आर्थिक संरक्षण; खरीपातील १४ पिकांचा योजनेत समावेश.
राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेंव्हा ३१ जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यासंदर्भातील …
Read More »दत्तात्रय भरणे याची माहिती, महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून सन्मान देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यातील महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार …
Read More »राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३-२४ चे वितरण नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प
‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने …
Read More »सत्यमेव जयते फार्मर कपचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
पानी फाऊंडेशन मार्फत २०२२ पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात ४६ तालुक्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यात शेतक-यांसाठी काम करत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ चा शुभारंभ सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई …
Read More »
Marathi e-Batmya