कृषी

मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे  यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचा निर्धार, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी शासन प्रयत्नशील राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार

“कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. तसेच नैसर्गिक संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी या कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे निर्देश …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आदेश एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा

जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७  एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. सप्टेंबर पूर्वीचा विचार केला तर नुकसान थोडं कमी …

Read More »

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यातील बांधावर जात केली बाधित क्षेत्राची पाहणी पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी मंजूर

“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …

Read More »

युरियासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र रब्बीसाठी १२ लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचीही मागणी

महाराष्ट्रात २०२५ रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहीत राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ २.३६ लाख मॅट्रिक …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, ऑगस्ट, सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान राज्यातील १७,८५,७१४ हेक्टर क्षेत्र बाधित

“ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना …

Read More »

नाफेडचा खुलासा, महाराष्ट्रात सध्या कांद्याची विक्री नाही मोठ्या प्रमाणावर विक्री करीत नसल्याबाबत नाफेडचे स्पष्टीकरण

नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक …

Read More »

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाखाच्या रकमेस मंजूरी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, …

Read More »

महाराष्ट्रात मान्सून अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेती पिकांचे नुकसान राज्यातील १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय.अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, …

Read More »