Editor

युट्युबर अजित भारती याची जामीनासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात, युट्युबर आणि आरक्षण सुधारणा कार्यकर्ते अजित भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. ऑगस्टमध्ये, नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षांच्या तक्रारीनंतर, अजित भारती यांच्या विरोधात …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल, काल पडलेली इमारत परवानगीने बांधली होती का? उच्चस्तरीय चौकशी करून पेईंग गेस्ट निवासस्थानांचे नियमन करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ‘म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली’ला (MCD) आदेश दिले की, दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन येथे कोसळलेली आणि सात जणांचा बळी घेणारी इमारत वैध परवानगीने बांधली होती का, याची उच्च-स्तरीय चौकशी करावी. तसेच, राजधानीतील ‘पेइंग गेस्ट’ (PG) निवासस्थानांचे नियमन करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. उच्च न्यायालयाने ही …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे …

Read More »

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार

राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील भरती परीक्षा …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, विश्व हिंदू परिषदेने गरबा -दांडियामध्ये घातलेल्या मुस्लिम बंदी संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी मुस्लिम द्वेष वाढवणे हा विश्व हिंदू परिषद आणि संघाचा अजेंडा

११ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रमध्ये गरबा- दांडिया खेळामध्ये मुस्लिम युवकांना बंदी घालण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने बेकायदा नियमावली जारी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर करून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी रविवारी केली. या संदर्भात आमदार रईस …

Read More »

दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.​ मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात …

Read More »

दिल्लीतील पाच मजली इमारतीच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरु असताना कोसळली ४०-५० वर्षी जुनी इमारत, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू तर काही जण जखमी

रविवारी सत्य निकेतनमध्ये कोसळलेली पाच मजली इमारत सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी होती आणि इमारत कोसळली तेव्हा तिच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरू होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. विद्यार्थ्यांच्या पेइंग गेस्ट निवासस्थान म्हणून वापरल्या जाणाऱ्या या इमारतीला एक तळघर आणि वरचे पाच मजले होते. या …

Read More »

उपपंतप्रधान इशाक दार यांच्याकडून सौदी, तुर्कस्थान आणि इजिप्तशी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा तीन देशांशी संरक्षण सहकार्य करार मक्का येथे पाकिस्तान करणार

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी रविवारी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात द्विपक्षीय संबंधांवर तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले. या संवादांमध्ये, इशाक दार यांनी परस्पर हिताच्या घडामोडींचा आढावा घेतला, इस्तंबूलमध्ये नुकत्याच झालेल्या संरक्षण …

Read More »

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संघर्ष अर्थात मारहाण केली. ज्यामुळे वाद विकोपाला गेला. रिलीफ हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरात एका रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक महिला कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना तिला …

Read More »

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नकाशाला भारताचा पाठिंबा, पण सीमा आणि वादग्रस्त भागास मान्यता नाही नकाशा दुरुस्त करण्याचा ठराव स्विकारल्यानंतर भारताचा सयुंक्त राष्ट्रसंघाला पाठिंबा

भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र (UN) आमसभेच्या समान-क्षेत्रफळ जागतिक नकाशांच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ठरावाला पाठिंबा दिला, परंतु हे स्पष्ट केले की त्यांचा पाठिंबा कोणत्याही विशिष्ट नकाशा प्रक्षेपणाला किंवा राष्ट्रीय सीमांच्या चित्रणाला मान्यता देत नाही. ४ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने “नकाशा दुरुस्त करा: जागतिक नकाशाशास्त्रीय प्रतिनिधित्वाचे पुनर्संतुलन करणे आणि जगाच्या प्रदेशांचे, …

Read More »