Editor

शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशात सुरु असेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आता शासनाला ३० जून २०२६ पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना …

Read More »

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे. रेल्वेमंत्री व केंद्रीय अर्थमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे मोदी- फडणवीस सरकारच जबाबदार कांद्याच्या हमीभावासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मविआचा शेतकरी क्रांती महामोर्चा, प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्या

कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र …

Read More »

आमदार रईस शेख यांची टीका, १०० दिवसांमध्ये मुंबई पालिकेवर रोख्याद्वारे पैसे उभे करण्याची वेळ काटकसरीसाठी सल्लागार न नेमण्याच्या सरकारच्या आदेशाला प्रशासनाचा हरताळ, रोखे आणि सल्लागाराचा निर्णय रद्द करण्याची मागणी

आशियातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर पहिल्या १०० दिवसांमध्येच  रोख्याद्वारे पैसे उभारण्याची वेळ पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणली असून ‘काटकसरीसाठी सल्लागार नेमू नये’ या सरकारच्या आदेशाला पालिका प्रशासनाने  हरताळ फासला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई …

Read More »

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास  उपराष्ट्रपती सी. पी.  राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील …

Read More »

रणवीर सिंगच्या विरोधात बॅनचे अस्त्र, डॉन ३ मधून अचानक बाहेर पडला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने घातली बंदी

फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ मधून अचानक बाहेर पडल्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंगवर अधिकृतपणे बंदी घातली आहे. या प्रकरणाला मोठी गती मिळाली आहे. फेडरेशनने गेल्या आठवड्यात हे प्रकरण हाती घेतले आणि सोमवारी एका पत्रकार परिषदेत माध्यमांना आपला अंतिम निर्णय जाहीर केला. …

Read More »

इराणबरोबरच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे, अब्राहम करारात सहभागी होण्याचे आवाहन युद्ध थांबवायला मध्यस्थी करूनही पाकिस्तान अडकला पेचात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याच्या शेवटी पाकिस्तान आणि अनेक अरब राष्ट्रांसोबत केलेल्या उच्चस्तरीय कॉन्फरन्स कॉलमुळे हॅम्लेटमधील ‘to be or not to be ही प्रसिद्ध ओळ इस्लामाबादच्या अंगावर उलटल्याचे दिसते. ॲक्सिऑसच्या (Axios) वृत्तानुसार, इराण युद्ध संपल्यानंतर अधिक मुस्लिम-बहुल देशांनी अब्राहम करारात सामील व्हावे, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रह धरला. सोप्या …

Read More »

सरकारी सूत्रांची माहिती, युद्ध थांबल्यास, चार ते पाच दिवसात पुरवठा पुर्ववत पर्यटन आणि संस्कृती विषयक संसदीय स्थायी समितीला दिले आश्वासन

पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढत असताना, केंद्र सरकारने सोमवारी एका संसदीय समितीला आश्वासन दिले की, भारत कोणत्याही व्यत्ययाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि संघर्षाची परिस्थिती निवळल्यास “चार ते पाच दिवसांत” पुरवठा पूर्ववत होईल. हे आश्वासन परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विषयक संसदीय स्थायी समितीच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक, दरवाढ तात्काळ मागे घ्या पेट्रोल डिझेल टंचाईची झळ मुंबईतही पोहचली, खोटी व दिशाभूल करणारी विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंधन पुरवठ्यावर लक्ष द्यावे

महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, शासकीय सेवा पुनरावलोकन करून जीपीआर प्रक्रिया कक्षेत आणाव्यात गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंगद्वारे सर्व विभागांच्या सेवांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश

शासकीय सेवा  सुलभ, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंग – जीपीआर) प्रक्रिया राज्यात राबविण्यात येत आहे. त्या प्रक्रियेला गती देऊन शासकीय सेवा व योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विभागांनी आपल्या सेवांचे पुनरावलोकन करून त्या जीपीआर प्रक्रिया कक्षेत आणाव्यात, असे निर्देश …

Read More »