मुंबईः प्रतिनिधी देणे समाजाचे या व्यासपीठाअंतर्गत राज्यातील ३० विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख समाजाला करुन देणे, त्यांना आर्थिक कुवतीनुसार अन्य स्वरुपात मदत मिळवून देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून पुण्यातील आट्रिस्ट्री संस्थेच्या वीणा गोखले यांनी मुंबईतील विले पार्ले येथे ८ आणि ९ फेब्रुवारी असे दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सामाजिक …
Read More »“पुण्यश्लोक अहिल्यादेवी” चित्रपटाच्या पोस्टरचे अजित पवारांच्या हस्ते अनावरण मराठी आणि हिंदी भाषेत तयार होणार चित्रपट
मुंबई: प्रतिनिधी समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सिनेमामुळे त्यांचे कार्य, घरा-घरात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री …
Read More »वीज ग्राहकांना कमी दरात वीज देण्यासाठी जनसुनावण्या घेणार ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला कमीत कमी दरात वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने वीजदरा संदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला आहे. या वीज दरासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी देत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येणार असून त्यानंतर एमईआरसीने घेतलेला निर्णय शासनाकडे येईल आणि …
Read More »केंद्र आणि राज्य सरकारच्या पहिल्याच कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री आदीत्य ठाकरेंच्या हस्ते मुंबईत ७-८ फेब्रुवारीला २३ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद
मुंबई: प्रतिनिधी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल अर्थव्यवस्था, शासनाच्या परिणामकारक शासन आणि सेवा वितरणासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर, सेवा वितरणाचा स्तर उंचावणे, डिजिटल व्यवहाराबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी पारदर्शिता याची सविस्तर माहिती करून देण्यासाठी आणि त्याचे महत्व समजून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने ७-८ फेब्रुवारीला २३ व्या राष्ट्रीय …
Read More »२०१८ सालचा राज्य वाड्ःमय पुरस्कार लाखे, डहाके, दळवींना मराठी भाषा विभागाकडून पुरस्कार जाहीर
मुंबईः प्रतिनिधी उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. 2018 या वर्षात प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2018 पुरस्कार जाहीर करण्यात आला …
Read More »महिला व बालकांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्यांची गय नाही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबधित गुन्हेगारांवर …
Read More »घरांच्या किंमतींसाठी रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली …
Read More »देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …
Read More »भाजपाच देशद्रोही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा …
Read More »रखडलेल्या “गृहनिर्माण” प्रकल्पातून बिल्डरांचा होणार “महाविकास” अर्थसहाय्याबरोबरच, प्रिमियम सुट, एफएसआय वाढीव देणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्ट्यांचे पुर्नविकास प्रकल्प, म्हाडा वसाहतीतील पुर्नविकास प्रकल्पांची कामे मार्गी एकाबाजूला राज्य सरकारने पुढाकार घेतला असला तरी या पुढाकाराच्या नावाखाली चक्क मर्जीतील बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी राज्य सरकारमधील एका वजनदार मंत्र्याने भलताच पुढाकार घेतल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. गेल्या अनेक वर्षापासून एसआरएचे जवळपास …
Read More »
Marathi e-Batmya