Editor

अहो फडणवीसजी, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठविलेल्या पत्रांचे काय झाले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना खोचक सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा पत्र लिहून वीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपाचा सावकरप्रेमाचा बुरखा फाडला. वीर सावरकर यांचा विधानसभेत गौरव …

Read More »

तावडेंनी स्थापन केलेले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गत सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली. सदस्य विलास पोतनीस यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना त्या बोलत होत्या. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापुर्ण आणि …

Read More »

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. विधान …

Read More »

आता १ ते १० वी मराठी विषय राहणारच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय येत्या शैक्षणिक वर्षांपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे विधानसभेत दिली. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत  शिवसेनासदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला …

Read More »

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  …

Read More »

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, आमदारांनो सभागृहात रोज हजर रहा महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, दोन्ही सभागृहाचे कामकाज आज लवकर संपले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दररोज सभागृहात हजर रहा असे आदेश दिले. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा …

Read More »

नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जणगणनेसाठी २६ कोटींची तरतूद

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. विशेष म्हणजे या पुरवणी मागण्यात काही नव्या योजनांचा सुतोवाच करण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धरले धारेवर शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार मुद्यावरून गोंधळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रूपये मदतीची मागणी करत या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विधानसभेत केली. मात्र विधानसभा अध्यक्ष …

Read More »

शेलारांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कान बधीर झाले विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने विरोधकांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »