मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाने मुदतीत संख्याबळ दाखविले नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर असलेल्या व्यक्तीसाठीच्या सवलतींचा मोह सोडवेनासा झाला असून सरकारच्या अखत्यारीतील माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्यांच्या प्रसिध्दीच्या कामासाठी वर्षा बंगल्यावर राबत असल्याची धक्कादायक …
Read More »वारकऱ्यांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखाची मदत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणेः प्रतिनिधी पुण्याजवळ दिवे घाटात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पार्टी आपल्या आपदा ट्रस्टमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले. चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी …
Read More »अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह ८ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, …
Read More »भिमा-कोरेगांव प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी ४ महिन्यांची वाढीव मुदत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार
मुंबई : प्रतिनिधी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदवण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. त्यानुसार सुरुवातीस ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे त्यांना समन्स काढण्यात आले आहे. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी आणखी ४ महिन्यांची मुदतवाढ …
Read More »सरकार स्थापनेचा प्रश्न आणि पवारांचे सूचक हास्य राजकिय संकेत की संभ्रमावस्था प्रश्न अनुत्तरीतच
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास २० दिवसांहून अधिकचा कालावधी झाला. मात्र सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचे सरकार याबाबतचा पेच अद्यापही सकृतदर्शनी सुटल्याचे दिसत नसले तरी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना याबाबत जेव्हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवारांच्या हसण्याने याबाबतचा …
Read More »शिकाँरासाठी स्वाभिमानी, समाजवादी आणि रिपाई-कवाडे पक्षाला विश्वासात घेणार काँग्रेस पक्षाध्यक्षा गांधींच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबधित चर्चा झाली असून या दोन्ही पक्षांच्या आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेतकरी स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी रिपाई-कवाडे गट यांना पुढील रणनीतीच्या अनुषंगाने विश्वासात घेतले जाणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतची भूमिका …
Read More »राष्ट्रपती राजवटीला सात दिवस झाले तरी अधिकारांचे वाटप नाही राज्याच्या मुख्य सचिवांकडून १३ नोव्हेंबरलाच राज्यपालांकडे प्रस्ताव सादर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही राजकिय पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानुसार केंद्र सरकारने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. मात्र राजवट लागू होवून ७ दिवस झाले तरी राज्याचा कारभार चालविण्यासाठी आवश्यक असलेले राज्यपालांचे सल्लागार मंडळ आणि अधिकाऱांचे …
Read More »…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांचे परखड मत
मुंबई: प्रतिनिधी जीवनविद्या मिशनचे तन-मन-धन यासंदर्भातील शिबिर अत्यंत अभ्यासपूर्ण, माहिती प्रचूर, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणांना साक्षात जीवंत करणारे असून अशी शिबिरे विदर्भ आणि मराठवाड्यात आयोजित करण्यात आली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित पणे थांबतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केले. जीवन विद्या मिशन बोरीवली शाखेच्या …
Read More »राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजाराची मदत जाहीर बागायतदारांना १८ हजार रूपयांची मदत
मुंबईः प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका सर्वच पक्षांकडून होवू लागली. याची गंभीर दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून हेक्टरी ८ हजाराची तर बागातयतदारांना १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किमान २ हेक्टर …
Read More »अयोथ्येतील राम मंदीर आणि मस्जिदीसाठी १ लाख ११ हजाराची देणगी अध्यक्ष परवेज अली सय्यद यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त अयोध्या येथील बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ नाहीशी झाली. त्यामुळे राम मंदीर उभारणीसाठी अल्पसंख्याक कल्याणकारी समितीकडून १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिल्याची माहिती परवेज अली सय्यद यांनी दिली. या निकालामुळे संपूर्ण देशातील हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली कटुता …
Read More »
Marathi e-Batmya