मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. या दोन वस्तुंचा काळाबाजार व …
Read More »४ तारखेला कोरेगांव-भीमा आयोगासमोर शरद पवार हजर राहणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरेगांव भिमा चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हजर राहणार आहेत. चार तारखेला ते साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे यापूर्वीच आयोगाला कळविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …
Read More »अखेर तावडेंच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वातंत्र्य संपुष्टात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणत या मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च …
Read More »अपार्टमेंटचा वाद आता उपनिंबधक आणि सहकार न्यायालयात सुटणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मुंबईसह लहान-मोठ्या शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणांमुळे अपार्टमेंट अर्थात गृहनिर्माण सोसायट्यांची निर्मिती झाली. मात्र अपार्टमेंट विकासक आणि रहिवाशांमधील वाद सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्षच नव्हते. मात्र आता त्यासाठी कायदेशीर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट १९७० या …
Read More »शासकिय कार्यालयांचे कमी संख्येत कामकाज चालविण्याचा विचार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात कमी उपस्थितीत कामकाज चालविण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य होणार नसल्याने नागरीकांनी गरज असेल तरच बाहेर …
Read More »कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत …
Read More »कोरोना इम्पॅक्टः मंत्रालयात बायोमेट्रीक हजेरी बंद, स्वच्छतेवर भर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने बायोमेट्रीक हजेरी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेत दर एक तासाला स्वयंचलित पायऱ्या (इस्केलेटर) , काचेच्या भिंती, फरश्यांची स्वच्छता आदी गोष्टींवर प्रशासनाने भर देण्यास सुरु केली आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी भागात कोरोनाचे रूग्ण …
Read More »मंत्रालयात प्रवेश बंदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला बैठकीत निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात उद्यापासून सर्वसामान्य नागरीकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा …
Read More »विद्यापीठ, डिएड, बीएड, इंजिनियरिंग आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा मार्चनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्च पर्यंत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डिएड. बीएड, इंजिनियरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावरील परिक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार असून याबाबतचा निर्णय २७-२८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सर्व माफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास सवलत
मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज पार पडले. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांना सर्व गोष्टी माफ असून त्यांनी किमान पुढील अधिवेशनात चर्चांना उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मंत्रालय व विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत ते …
Read More »
Marathi e-Batmya