मुंबई: प्रतिनिधी शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून युध्दपातळीवर प्रयत्न करत असतानाच मुंबईतील ऐन मध्यवर्तीभागातील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे १० रूग्ण सापडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला मोठ्या मेहनतीने यश आले. वरळी कोळीवड्यात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच या …
Read More »केंद्र सरकारकडून अल्पबचत ठेवींवरील व्याजात कपात कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कपात तीन महिन्यासाठी
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य नागरीकांकडून पैशांची बचत करण्याकरीता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध योजनांमध्ये पैश्याची गुंतवणूक केली जाते. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्याकरीताअल्पकालीन बचतीवरील व्याजात १ ते ३ टक्क्यापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या अल्पकालीन बचतीमध्ये साधारण …
Read More »तर विद्यार्थी कार्यकर्त्ये सरकारसाठी स्वंयसेवक म्हणून काम करतील छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी जाहीर केली. तरीही संचारबंदीत अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांकडून गर्दी करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी मुंबई छात्रभारतीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणुन काम करायला तयार असल्याबाबतचे पत्र मुंबई छात्रभारती संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले आहे. …
Read More »…. आता खैर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. …
Read More »गाठोडं सोन्याच… (सत्य घटनेवर आधारित) सर्जनशील कलाकार, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची कथा
वेळ साधारण, रात्र संपून दिवस उजाडायच्या आधीची, दोन चोर सोन्याच्या दुकानातली चोरी आटोपवून सगळा माल आपल्या जवळच्या गाठोडयात बांधून त्यांच्या खटारा इंडिका ह्या गाडीमध्ये घेऊन बसले. ज्या गावात चोरी केली ते गाव मागे जावून काहीच वेळ झाला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, एक पोलीसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. दोघेही …
Read More »आमदारानेच बांधली मशीन पाठीवर, अन् केली निर्जंतुकीकरणाची फवारणी जनतेच्या सुरक्षेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर
अहमदनगर: प्रतिनिधी जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: पाठीवर मशीन बांधून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना …
Read More »कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …
Read More »ग्रामीण भागातील २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे संरक्षण अंगणवाडी, आशा वर्कर आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय: ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाख रकमेच्या विमा संरक्षणाचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन …
Read More »शेतकऱ्यांसाठी खुषखबर: दररोज १० लाख लिटर दूधाची खरेदी २५ रुपये दराने करणार असल्याची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात …
Read More »कामगार मंत्री वळसे-पाटील झाले मुक्त सोलापूरची जबाबदारी आता गृहनिर्माण मंत्री आव्हाडांकडे
मुंबई: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र या धामधुमितही कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा पदभार काढून तो गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच यासंदर्भात शासन आदेशही तातडीने जारी करण्यात आला. कामगार मंत्री दिलीप वळसे –पाटील हे अभ्यासू …
Read More »
Marathi e-Batmya