Editor

“हौस पुरवा महाराज, मला आणा एक १५ लाखाची गाडी” दोन महिन्यासाठी मंत्रीपद मिळूनही मंत्र्यांचा नव्या गाडीसाठी अट्टाहास

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत १३ नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला. मात्र या सर्वच मंत्र्यांना अवघा दोन महिन्याचा कालावधी मिळणार असताना यातील काही मंत्र्यांनी नव्या चारचाकी वाहनासाठी आपल्याच विभागाकडे हट्ट धरल्याची माहिती नुकतीच पुढे आली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कँबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश …

Read More »

धनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्या- मेंढी गटाचे वाटप पदुम मंत्री महादेव जानकर यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी बंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ.ज.क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज दिले. महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या स्वरुपाच्या …

Read More »

हसन मुश्रीम यांच्या घरावरील छाप्याचा राष्ट्रवादीकडून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि पुणे येथील त्यांच्या मुलांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यामुळे सरकारकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सच्चा नेत्याला भय दाखवायचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, सरकारी निवेदनाला बगल देणाऱ्या तसेच …

Read More »

निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा सेनेत प्रवेश आम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करण्याची राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

आणि राष्ट्रवादीचे घड्याळ उलटे फिरू लागले उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पाच वर्षापूर्वी शिवसेना, भाजपानंतर काँग्रेसमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकिय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा शोधला. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून आपले राजकिय अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्यापाठोपाठ मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत …

Read More »

मुंबईतली वाहने म्हणणार DK : मरते दम तकची आठवण करून देणार नवी सीरीज करत असल्याची परिवहन विभागाची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात चारचाकी वाहनांसाठी DK ( डिके ) ही नवी सीरीज सुरू करण्यात येत असून डॉयलॉग किंग राजकुमार आणि स्व. अभिनेते ओमपुरी यांच्या मरते दम तक हिंदी चित्रपटातील डॉयलॉगच्या धर्तीवर ही सीरीज सुरू करण्यात येत असल्याची चर्चा परिवहन विभागात सुरु आहे. हिंदीतील सुपर हीट …

Read More »

स्टील उद्योग उभारणीसाठी रशिया आठशे कोटींची गुंतवणूक करणार स्टिल कंपनीला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. तसेच या उद्योगाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी …

Read More »

मुंबई, कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या पावसाने उघडीप दिलेली असली तरी पुढील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस …

Read More »

आणि सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला पावसाच्या उघडपीने चाकरमान्यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी १०.३० वाजल्यानंतर उघडीप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरातून कामावर तरी जावू देतो की नाही म्हणून विचार करणाऱ्या चाकरमान्यांना या उघडपीने चांगलाच दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा,विक्रोळी, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच होती. …

Read More »

मुंबईच्या उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या तिन्ही मार्गास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी 9.209 किमी आहे. यापैकी 8.529 किमी उन्नत तर 0.68 किमी भुयारी मार्ग आहे. …

Read More »