Editor

जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

आरे, नाणारला विरोध करणारी शिवसेना रत्नागिरीत पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी आग्रही रोजगार देणारी तीन हजार एकर जमिन बड्या उद्योजकाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील

मुंबईः खास प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण आणि कोकणाच्या विकासाच्या नावाखाली उध्दवस्त करणारे नाणार, जैतापूर प्रकल्प आणि मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीतील एका उद्योजकाच्या व्यवसायवृध्दीसाठी तीन हजार एकर बागायती आणि पर्यावरणाखाली असलेली जमिन उजाड करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच मराठीe-बातम्या.कॉमच्या हाती आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीच जैतापुर …

Read More »

राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …

Read More »

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा शपथनामा प्रकाशित दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा जाहीरनामा

मुंबईः प्रतिनिधी रयतेचे राज्य आणण्यासाठी १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेत स्वराज्याची स्थापना केली. तीच प्रेरणा घेऊन शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना ५ हजार रू. महिना बेकारीभत्ता आणि नव्या उद्योगात भूमीपुत्रांना ८०% नोक-या, दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, व उद्योगाला चालना यामी …

Read More »

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …

Read More »

भाजपाने रासपला फसविले, धोका दिला महादेव जानकर यांच्या निमित्ताने महायुतीतील खदखद बाहेर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेने गतवेळच्याप्रमाणे महायुतीची घोषणा केली. या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधानसभेच्या जागा दिल्या नसल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगत आम्हाला फसविल्याचा जाहीर आरोप भाजपावर केला. महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला …

Read More »

भाजपा उमेदवाराचे नाव काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत आघाडीच्या शपथनाम्यात गोंदीयाच्या उमेदवाराचे नाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक लहान-मोठ्या पक्षांना घेवून आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जाहिरनामा समितीत भाजपाचे गोंदीयातील उमेदवार गोपालदास अगरवाल यांचे नाव असल्याने आघाडीच्या जाहीरनाम्याच्या शपथनामाबाबत संशय निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीमध्ये भारतीय कम्युनिस्ट …

Read More »

प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी आरेप्रकरणी कुठे गेले? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा खोचक सवाल

मुंबईः प्रतिनिधी आरेत वृक्षतोड होत असताना प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी कुठे गेले?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत ही वृक्षतोड म्हणजे मुंबईकरांना नाक दाबून मारण्याचा प्रकार असल्याची टीका केली. गेली २५ वर्षे शिवसेना जीव घेत होती. आता भाजपसोबत युती करून सामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहे असा …

Read More »

ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनानंतर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा कोथरूडमधील उमेदवारी मागे घेण्याचे संघटनेची तयारी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी कोथरूडमधील स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा अर्थात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला. तसेच पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. मात्र याप्रश्नी बैठक होत ब्राम्हण महासंघाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाने पाटील यांच्या विरोधातील भूमिका मागे घेत त्यांना …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …

Read More »