Editor

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाला विदर्भात न जाण्याचे आदेश राष्ट्र्वादी काँग्रेसचे शरद पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करा मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष न्या. व्ही. एम. कानडे यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा तळोजा मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष व्ही. एम. कानडे यांनी आज दिले. हरित लवादाकडे अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणासंदर्भात केलेल्या तक्रारीवरुन तळोजा औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रदूषणासंदर्भात एका बैठकीचे आयोजन इंडियन मर्चंट चेंबरमध्ये …

Read More »

जवानांच्या नावे राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला सैनिकांचाच विसर वाटपासाठी महसूल मंत्री पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांना जमिनच मिळेना

मुंबई : गिरिराज सावंत केंद्र आणि राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी अतिरेक्यांच्या हल्ल्यात लष्करातील हुतात्मा सैनिकांच्या बलिदानाचा वापर भाजपने केला. परंतु सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भाजपच्याच महाराष्ट्रातील भाजप सरकारला या लष्करी सैनिकांचाच विसर पडला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून विविध युध्दात आपल्या कर्तबगारीने देशाच्या विजयात मानाचा तुरा खोवणाऱ्या सैनिकांना उपजिविका आणि निवाऱा …

Read More »

मंत्री बडोले यांच्यामुळे सरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण सामान्य प्रशासनाकडून अखेर आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी शासन सेवेत सरळसेवा भरती करताना आता पुन्हा समांतर आरक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. आणि एसईबीसी समाजघटकांना दिलासा मिळाला. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने तगादा लावला. त्यामुळे …

Read More »

१५१ दुष्काळी तालुक्यातील पाणी पुरवठ्याची थकबाकी टंचाई निधीतून ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या थकित बिलांवरील दंड-व्याज माफ करण्यात आले आहे. तसेच दुष्काळी तालुक्यांतील व महसूल मंडळातील नोव्हेंबर २०१८ पासून जून २०१९ पर्यंतचे …

Read More »

मंत्र्यांनी सांगूनही सामाजिक न्याय विभागांतील अधिकाऱ्यांचा आचरटपणा बैठकीत चुकीच्या माहितींचा अधिकाऱ्यांकडून पाऊस

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. परंतु यातील अनेक योजनांची सविस्तर माहिती किंवा त्याचा इतिहासच या …

Read More »

कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला. गुरुवारी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही …

Read More »

१८ फेब्रुवारीऐवजी आता २५ फेब्रवारीला लेखानुदान अधिवेशन राज्य सरकार करणार राज्यपालांना विनंती

मुंबई : प्रतिनिधी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी १८ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय ऐवजी लेखानुदान अधिवेशन घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आता सरकारने अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशी राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राजधानी दिल्लीतही …

Read More »

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संसदीय परिषद रदद् करा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद १५जानेवारी …

Read More »

सरकारबरोबरची चर्चा फिसकटल्याने कर्मचारी संपावर जाणार ३५९ स्थानिक स्वराज्य संस्थामधील ८० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याची डॉ.कऱ्हाड यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३५९ नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रकरणी १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही राज्य सरकारने बोलाविलेल्या बैठकीत पुन्हा थातूर-मातूर उत्तर दिल्याने मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बंसणार नाही असा इशारा नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला. तसेच १ …

Read More »