Editor

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निकृष्ट कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण डेमोक्रॅटिक आरपीआयच्या आंदोलनाची दखल

मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. …

Read More »

वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती

राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात  वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली. या संदर्भात …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपस्थित प्रश्नावर उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी विहित नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात पूर्वी अनेक शाळांना कायम …

Read More »

पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या काम करणाऱ्यांनाच संघटनेत मिळणार पदे, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात  काम करणा-या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून …

Read More »

जयकुमार रावल यांची माहिती, परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात खरेदीची परवानगी

बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार  राज्यात निदर्शनास येत आहेत.  त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन …

Read More »

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील  सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व  विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमलीपदार्थ तस्करी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई कायद्यात बदल करणार असल्याचे दिले आश्वासन

‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील …

Read More »

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच मुख्यमंत्री अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून

मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी अडीच वर्षे सिद्धरामय्या तर अडीच वर्षे डी के शिवकुमार हे राहतील अशी चर्चा कर्नाटकातील निवडणूकीनंतर सुरु झाली होती. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडीच वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांना बदलण्याचे संकेत काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून देण्यात येत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसाकडे केली आमदार सुनिल शेळके यांची तक्रार रॉयल्टी बुडवल्याचा केला आरोप, पत्र पाठवत केली मोठा आरोप

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे …

Read More »

नाल्याच्या प्रश्नावरून…सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, दादा कोंडके सारखे…. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना एसंशिचे मंत्री संजय राठोड यांच्या उत्तरावरून नापसंती

पावसाळी अधिवेशनाच्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने कमी असले तरी विरोधकांकडून राज्यातील जनतेच्या प्रश्नांवरून रण उठविले जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र संख्याबळाच्या संख्येत लहान असलेल्या विरोधकांमध्ये अनेक प्रश्नांवरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला विरोधकांकडून दररोज विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष …

Read More »