मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका आंतर-विवाह करणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला, या जोडप्याने विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत त्यांचे विवाह नोंदणीकृत केले आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड लॉ नुसार मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्यातील विवाह अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवले. जोडप्याने पोलिस संरक्षण मागणारी याचिचा मध्य प्रदेश उच्च …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली …
Read More »मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मेगाब्लॉक मागे घेण्याची केली मागणी..
प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द होणार असल्याने ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे …
Read More »अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला
मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …
Read More »डॉ मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना फटकारले, पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली हेट स्पीच वापरून कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूकीचे ६ टप्पे पार पडले असून ७ वा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र भाजपाच्या आणि स्वतःच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरात प्रचार सभा घेतल्या. यातील अनेक सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या …
Read More »आरोग्य विमा संदर्भातील नवे नियमाचे परिपत्रक जाहिर आयआरडीएआयने केली निकषांमध्ये सुधारणा
पॉलिसीधारकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणि सर्वसमावेशक आरोग्य विम्याला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने नियामक निकषांमध्ये मोठी सुधारणा जाहीर केली आहे. नियामकाने आरोग्य विमा उत्पादनांवरील सर्वसमावेशक मास्टर परिपत्रक जारी केले असून ५५ परिपत्रके रद्द केली आहेत. हे मास्टर परिपत्रक आयआरडीएआय IRDAI ने गेल्या …
Read More »मनरेगा योजनेत बदल होण्याची शक्यता राज्यांनाही या योजनेत सहभागी करणार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा (MGNREGS) निधीचे लिकेज दूर करण्यासाठी आणि राज्य सरकारांना सक्रिय भागधारक म्हणून सामील करण्यासाठी येत्या काही महिन्यांत केंद्राद्वारे सुधारित केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला दिली. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “योजनेला त्याच्या उद्दिष्टासाठी फायदेशीर करण्यासाठी आम्हाला राज्यांच्या सक्रिय …
Read More »टाटा स्टील कंपनीने जाहिर केला डिव्हिडंड कंपनीचा महसूल ७ टक्क्याने कमी होऊनही जाहिर
टाटा स्टीलने बुधवारी FY२०२३-२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत ६११ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. FY24 च्या शेवटच्या तिमाहीत निव्वळ नफा वर्ष-दर-वर्ष (YoY) आधारावर जवळजवळ ६५% ने घसरला आहे, जो Q4FY२३ मध्ये रु. १,५६६ कोटी होता. अहवालाच्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक ७% कमी होऊन ५८,६८७ कोटी रुपये झाला. Q-o-Q आधारावर, ऑपरेशन्समधून एकत्रित …
Read More »रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ईसीएल, एआरसी कंपन्यांवर निर्बंध एडलवाईज ग्रुपशी संबधित कंपन्यांवर कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की त्यांनी सामग्री पर्यवेक्षी चिंतेचा हवाला देऊन ईसीएल ECL फायनान्स लिमिटेड आणि एडलवाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी एआरसी (ARC) लिमिटेड विरुद्ध पर्यवेक्षी कारवाई केली आहे. सेंट्रल बँकेने, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि रिझर्व्ह बँक …
Read More »पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित ससूर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे सक्तीच्या रजेवर
पुणे कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या ब्लड सॅम्पल बदलणारे ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी हाळनोर यांच्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली. तर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून ससून रुग्णालयाचा शिपाई …
Read More »
Marathi e-Batmya