सन २०२४-२५ या आथिक वर्षाकरिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ७१२ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ५.७७ कोटी रुपये असा एकूण ७६८.७७ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीस मंजुरी देण्यात आली, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर …
Read More »महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार
मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …
Read More »अजित पवार यांची सूचना, केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करा
पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’ वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची खोचक सूचना…तर दिवाळीसाठी गरिबांना हजार रुपये द्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या दिवशी दिवाळी साजरी करण्यावरून दिला खोचक सल्ला
२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत भाजपाचे आणि भाजपाशी संबधित विविध संघटनांचे कार्यकर्त्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी जात अक्षता वाटप करत त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आव्हान जनतेला करत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, … चुका मान्य करता, मग गुन्हा दाखल का केला नाही?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील …
Read More »बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध
देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलाची हत्या केली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास ११ जणांना जन्मठेपेची आणि सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. मात्र १५ ऑगस्ट २०२० रोजीच या सर्व आरोपींना गुजरात सरकारने एका जुन्या अध्यादेशाचा आधार घेत शिक्षा कमी …
Read More »मुस्लिम संघटनांची मागणी, राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राजकारण करू नका जमाते ए-इस्लामी संघटनेने केली मागणी
देशातील असंख्य भारतीय हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. मात्र या राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे राजकियकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाचा उपयोग भाजपाकडून त्यांच्या एका राजकिय साधणाचा वापर करत असल्याचा आरोप जमात ए-इस्लामी संघटनेने करत राम मंदिराच्या …
Read More »छगन भुजबळ यांचा सवाल, जेसीबी, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करणारे गरीब का?
सरसकट ओबीसी मध्ये संपूर्ण मराठा समावेश हे कदापिही शक्य नाही. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही तर वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या मागासवर्गीयांना सामजिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते स्वतंत्र द्या, ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही …
Read More »Microsoft , google वरही काश्मिरी भाषा उपलब्ध होणार
जगभरातील अनेक देशांच्या आणि राज्याच्या राज भाषांचे इंग्रजीत आणि इंग्रजीतून स्थानिक भाषेचा वापर करणाऱ्या तरूणाईला भाषेचे बंधन कधी आडवे आले नाही. मात्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरी भाषेला मात्र Microsoft , google या कंपन्यांच्या संकेतस्थळावर स्थान नव्हते. मात्र काश्मिरी भाषेत लिखाण, वाचण करणाऱ्या आणि काश्मिरी भाषेतील साहित्य आता या दोन्ही …
Read More »शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली
देशातील सर्वात जास्त लांबी असलेला २२ किमीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya