Breaking News

आता बँक तुमच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र घेणार, कुठेही जाण्याची गरज नाही फक्त फी तेवढी भरावी लागणार

ऑक्टोबर संपत आला असून देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात त्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी आहे. तर …

Read More »

परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरच्या घसरणीसह ५८३.५३ अब्ज डॉलरवर आरबीआयने जाहिर केली आकडेवारी

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरने घसरून ५८३.५३ अब्ज डॉलर झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परकीय चलनाचा साठा ५८५.८९ अब्ज डॉलर होता. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी …

Read More »

आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे विसरला तर करा हे काम आधार कार्डला लिंक केलेला नंबर विसरला; वाचा खाली दिलेला लेख

सध्या आधार कार्ड खुप महत्वपूर्ण बनले असून अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी महत्वपूर्ण आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकालं जातं. बँक अकाउंट ओपन करण्यापासून ते मुलांच्या शाळेमध्ये अॅडमिशन, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अत्यंत गरजेचं असतं. सुरक्षेच्या हिशोबाने …

Read More »

झेंडूच्या फुलांनी दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

झेंडूच्या उत्पादनाने दसरा, दिवाळी सुखात जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या कवडीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड …

Read More »

कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण …

Read More »

कांदा पुन्हा रडवणार; दिल्लीमध्ये ८० रुपये किलोने विकला जातोय कांदा दिल्लीत किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव भिडतायत गगनाला

दिवाळी जवळ आलेली असताना कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी सारख्या सुमारे ४०० यशस्वी स्टोअर्समध्ये कांदा चढ्या भावाने विकला जात आहे. तसेच ई-कॉमर्स पोर्टल बिग बास्केट …

Read More »

ऑक्टोबर हिटचा शहरातून काढता पाय थंडीची सुखद चाहूल, पण राज्यात प्रदूषणाचा विळखा कायम

हवेची घसरलेली गुणवत्ता, धूळ, धुरके, त्यातच ऑक्टोबर हिट या सगळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आल्हाददायक बातमी आहे. ऑक्टोबर हिटने आता शहरातून काढता पाय घेतल्याचे संकेत असून गुलाबी थंडीचे चोरपावलांनी आगमन झाले आहे.शनिवारी त्याची प्रचीती आली. मुंबईच्या तापमानात घसरण होऊन पारा २१ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचेही तापमान तेवढेच …

Read More »

अक्षया देवधर या कारणांमुळे दिसत नाहीये कोणत्याही चित्रपट, मालिकेत अक्षर देवधर या कारणामुळे मालिका चित्रपट क्षेत्रापासून दूर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून नावारूपाला आलेली पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहचले. या मालिकेतून त्या दोघांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र येत चाहत्यांना सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हार्दिक तुझेच …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी …

Read More »