प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही बाब देखील …
Read More »कंत्राटी नोकरीप्रश्नी भीम आर्मी काढणार पुणे ते मंत्रालय लाँग मार्च मंत्री आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणार
राज्य सरकारच्या शिक्षकांसह सर्व जागा तसेच पोलीस दलाच्या खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात सर्व मंत्री तसेच सत्तेतील लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी जाब विचारण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून लवकरच पुणे ते मंत्रालय असा सर्वसमावेशक लाँग मार्च काढण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महासचिव अशोक …
Read More »“गर्वसे कहो हम एमआयएम हैं ” सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. …
Read More »अजित पवारांचा जमिनीच्या लिलावासाठी दबाव; मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आयपीएस दधिकारी मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या खुलासानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात पोलीस जमिनीच्या झालेल्या गैर व्यवहाराचा उल्लेख करून राज्याच्या राजकारणात दादा म्हंटल जाणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून थेट तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,… मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण? भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल
राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही, त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी …
Read More »आम्ही एका बाळाला मारण्याची परवानगी देऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती २६ आठवड्यांवरील गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका महिलेला २६ महिन्यावरील गर्भधारणा संपुष्ठात आणण्याची देण्यात येणारी परवानगी नाकारली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकालाचा दाखला दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकार बाळाच्या जन्मानंतर त्या बाळाची पूर्ण काळजी घेऊ शकते. २६ आठवड्यांवरील गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी एम्सला निर्देश देण्याची परवानगी मागणाऱ्या …
Read More »सर्वसामान्यांना मोठा दिलासा, घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात नकारात्मक महागाई दर सलग सहाव्यांदा घटला
खाद्यपदार्थांच्या घसरणीमुळे सप्टेंबर महिन्यात भारताची घाऊक महागाई दर -०.२६ टक्के राहिला आहे. घाऊक महागाई शून्याच्या खाली गेलेला हा सलग सहावा महिना आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर -०.५२ टक्के तर जुलैमध्ये -१.३६ टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाची आकडेवारी जाहीर केली. घाऊक महागाई नकारात्मक झोनमध्ये राहिलेला हा सलग सहावा महिना …
Read More »या आठवड्यात गुंतवणूकदारांना या कंपन्या देणार लाभांश टीसीएस, टाटा समूह या कंपन्यांसह या कंपन्याकडून वाटप
चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही पूर्ण झाली असून तिसरी तिमाही ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. यासोबतच शेअर बाजारातील कंपन्यांच्या नव्या तिमाही निकालांचा हंगामही सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात, टाटा समूहाच्या टीसीएसने नवीन निकालांचा हंगाम सुरू केला. आता नवीन आठवड्यात लाभांशाची प्रक्रिया सुरू होत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन कमाईच्या संधी खुल्या …
Read More »चालू आठवड्यात या कंपन्या जाहीर करणार तिमाही निकाल, पहा यादी या कंपन्या जाहिर करणार तिमाही निकाल
या आठवड्यात म्हणजेच १६-२१ ऑक्टोबर दरम्यान अनेक बँका आणि कंपन्यांचे जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, सीएट, विप्रो, बजाज ऑटो आदी कंपन्यांचा समावेश आहे. तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या सर्व कंपन्यांची यादी जाणून घेऊया. या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार १६ ऑक्टोबर …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप,… अपघात रोखण्यास सरकार अपयशी घटनेची चौकशी करून दोषी कारवाई करावी
समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या असून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज रात्री घडलेल्या अपघाताची दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी …
Read More »
Marathi e-Batmya