Breaking News

मराठी माणसाचा मुंबईवर जीव पण सत्ताधाऱ्यांना वाटते अंडी देणारी कोंबडी ! मुंबईच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईने आलेल्या प्रत्येकाला आधार दिलेला आहे. आर्थिक राजधानी म्हणून देशाच्या जडणघडणीत मुलाचे योगदान दिलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी वाटते. मराठी माणसाचा या मुंबईवर प्रचंड जीव आहे. पण मराठी माणसाच्या हातातून मुंबई काढून घ्यायची हा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. …

Read More »

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री …

Read More »

शरद पवार म्हणाले, तुमच्या राष्ट्रवादीचं म्हणण बरोबर असल्याचे लवकरच कळेल… बॅलार्ड पिअर्स येथील जाहिर सभेत शरद पवार यांच सुतोवाचं

मध्यंतरी आपल्या पक्षातील काही जणांनी वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तसेच त्यांनी त्यांचा अध्यक्ष निवडल्याचेही वर्तमान पत्रात वाचलं. पण तुम्ही निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला हे मला माहित आहे. पण त्यांनी निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला की नाही मला माहित नाही असा टोला अजित पवार आणि गटाचे नाव न घेता राष्ट्रवादी …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ जागा मिळतील म्हणून भाजपा सोबत आला …. गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता मग समाजवाद्यांशी बोललो तर कुठे बिघडलं

महाराष्ट्राने मुंबई मिळवली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासह सर्वजण महाराष्ट्रासाठी एकत्रित आले. त्यावेळी तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपा कुठे होता. ते तर ना स्वातंत्र्य लढ्यात होते ना महाराष्ट्राला मुंबई मिळावी या लढ्यात होते. पण त्यावेळी होत असलेल्या निवडणूकांमध्ये काही जागा मिळतील म्हणून त्यावेळचा …

Read More »

पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केंद्रीय सांस्कृतिक व खेळा विभागाच्या स्पर्धेसाठी निवड झाली

केंद्रीय सांस्कृतिक व खेळ विभाग यांच्या वतीने अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धांचे आयोजन प्रतिवर्ष प्रमाणे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधित त्यागराज स्टेडियम, त्यागराज नगर, दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी सचिवालय जिमखाना येथे मानद सचिव कुस्तीगीर संजय पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. …

Read More »

जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?

साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ …

Read More »

खुषखबर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयातीवर बंदी हटविली हार्डवेअर उद्योगाच्या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतला

भारतीयांसाठी एक खुषखबर असून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या आधीच्या निर्णयापासून केंद्र सरकार मागे हटले आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या …

Read More »

परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घसरण सलग पाचव्या आठवड्यात घट, कारण जाणून घ्या

देशाचा परकीय चलन साठा ६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात, देशाचा एकूण चलन साठा ३.७९ अब्ज डॉलरने घसरून ५८६.९१ अब्ज डॉलर झाला. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलन साठ्याने ६४५ अब्ज डॉलर …

Read More »

सर्वबाद १९१ पाकिस्तानवर भारताचा ७ गडी राखून विजय एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सलग ८ वा विजय

कसोटी सामना असो की २०- ट्विंटी क्रिकेटचा सामना असो भारत विरूध्द पाकिस्तान सामन्यात कोण जिंकतो आणि कोण हारतो या गोष्टीकडे भारतासह सबंध जगभराचे डोळे या सामन्याकडे लागलेले असतात. तसेच दोन्ही सामन्यात रोमहर्षक खेळ होत असल्याने सबंध जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाच्या दृष्टीने सामना असतो. आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी …

Read More »

…देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय आ. प्रविण दरेकर यांचा आरोप

आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने त्यांना टार्गेट केले जातेय, असा आरोप दरेकर यांनी केला. …

Read More »