Breaking News

मृत्यू कसा आणि कधी झाला याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी न्यायवैद्यक शास्त्राकडे मुलींनी मागे न पडत करियर म्हणून पाहावे; डॉ. सारा हिनावी यांचा सल्ला

  अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा निर्जल स्थाळी बेवारस मृतदेह सापडतात अशा मृतदेहाची कधी-कधी ओळख पटवणे पोलिसांसह फॉरेन्सिकचे टीमला सुद्धा कठीण जाते मात्र यावर संशोधन करणाऱ्या डॉ सारा हिनावी यांनी यावर संशोधन करून मृतदेहाची ओळख पटण्यासंदर्भातील प्रक्रियेवर संशोधन करून आपल्या संशोधनाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र …

Read More »

फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चं आयोजन; मात्र १५६ तरुण गरबा कार्यक्रमाला पोहोचलेच नाहीत ! फाल्गुनी पाठक गरबा कार्यक्रमाच्या पासच्या आमिषाने १५६ तरुणांची फसवणूक

गायक फाल्गुनी पाठक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नवरात्रौउत्सवानिमित्त मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४५०० रुपयांचे पास होते. याच गोष्टीचा …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रला दुसऱ्या तिमाहीत ९२० कोटींचा नफा दुसऱ्या तिमाहीतही नफा

सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा ७२ टक्क्यांनी वाढून ९२० कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ५३५ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा कमावला होता. व्याज उत्पन्नात वाढ आणि बुडीत कर्जे कमी झाल्याने बँकेचा नफा वाढला आहे. तिमाहीत बँकेचे …

Read More »

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर दुसऱ्या तिमाहीत १५,९७६ कोटींचा निव्वळ नफा

एचडीएफसी बँकेने सोमवारी (१६ ऑक्टोबर) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५०.६ टक्के वाढून १५,९७६.११ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने १०,६०९५.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ७८,४०६ कोटी …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकारीणीचा विस्तार: या नव्या नेत्यांची वर्णी मनोहर जोशींची नेतेपदी नियुक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पडझडीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकारिणीत नेते, उपनेते आणि संघटक आणि सचिव अशा नियुक्त्या जाहीर यात अडगळीत पडलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना नेतेपदी संधी देण्यात आली असून विस्तारात खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, रवींद्र वायकर आणि आमदार …

Read More »

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिराव फुले आणि …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, मीरा बोरवणकरांच्या आरोपांची न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची …

Read More »

शिंदे गटाचे खासदार ठाम, आपण २२ जागांचीच भाजपाकडे मागणी करायची ठाकरे गटाच्याही जागांवर दावा करणार

शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असताना लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या खासदारांबरोबरच विद्यमान ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा भाजपाकडे मागणी करायच्याच अशी …

Read More »

घरगुती फवारणीसाठी किटकनाशके आणि विक्रेत्यांना परवाना आवश्यक विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक असल्याची माहिती, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. अंकुश माने यांनी म्हटले आहे की, …

Read More »