राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सरकार गंभीर नाही आहे. राज्य सरकारकडून आरोग्य विभाग, शैक्षणिक आणि पोलीस दलात सरकारच्या वतीने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत चार विभागात ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश
जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …
Read More »टोलबाबत झालेल्या चर्चेची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली “ही” माहिती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे सरकारचे मंत्री आणि प्रशासकिय अधिकारी पोहोचले
मुंबई एंट्री पॉईंटवरची टोलवाढ आणि एकूणच टोलबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या तक्रारी, राग आहे याला वाचा फोडण्यासाठी काल मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच दादा भुसे ह्यांच्यासोबत बैठक झाली. ९ वर्षांपूर्वी ह्याच विषयावर आम्ही तात्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो; तेंव्हाच लक्षात आलं होतं की सरकारने टोल कंपन्यांशी केलेले करार होते जे २०२६ पर्यंत आहेत. ह्यातले …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, टोलनाक्यांवर सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे कॅमेरे कशासाठी? सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही
राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी मंत्री …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेः कोणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा, आदेश पाळा अपात्र आमदार प्रकरणी न्यायालयाने सुनावले
महाराष्ट्रातील शिवसेनेतील बंडप्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही विधानसभा अध्यक्ष सातत्याने चालढकल करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला मागे टाकता येत नाही आणि पुढील निवडणूका जाहिर होण्यापूर्वी याप्रकरणी अंतिम निकाल घ्यायचा आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, जे बी परडीवाला आणि …
Read More »एचसीएल टेककडून भागधारकांना लाभांश जाहीर १० रूपयांचा प्रति लाभांश
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या …
Read More »अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी, औद्योगिक उत्पादनात वाढ ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ
ऑगस्ट महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) १०.३ टक्क्यांनी वाढले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात ०.७ टक्क्यांनी घसरले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ९.३ टक्क्यांनी …
Read More »आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन
राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल …
Read More »Operation Ajay : इस्रायलमधून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत उतरले Operation Ajay: इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Operation Ajay : चालू युद्धात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी घेऊन जाणारे विमान शुक्रवारी सकाळी ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत नवी दिल्लीत दाखल झाले. इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. …
Read More »इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल केले जाहीर लाभांशाचीही घोषणा
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे. तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. …
Read More »
Marathi e-Batmya