Breaking News

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावे महिनाभरात आरक्षण द्या

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान या बैठकीच्या ठराव प्रत आज माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे …

Read More »

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार संयुक्त समितीच्या बैठकीत निर्णय

बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषीतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक व विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून ३० दिवसांत सुधारणा व सूचना मागवून घेण्याचा निर्णय आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »

मराठवाडयातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तात्काळ शासनास सादर करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विभागीय आयुक्तांना निर्देश

राज्यातील व विशेषत; मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीसमाजाचे दाखले देवून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा तत्वत; निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता मराठवाडा विभागातील इनाम जमिनीसंदर्भात देखील निर्णय घेण्यात येणार आहे , संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने सादर करावा. विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन वस्तुनिष्ठ …

Read More »

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मोर्चा प्रदेश …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, सरकारची कंत्राटी नोकर भरती ही सुशिक्षीत तरुणांचे शोषण करणारी कंत्राटी नोकर भरती थांबवा अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु

देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने …

Read More »

संसदेतील मार्शल्सचा ड्रेस कोड बदलला, मोदी सरकारचा आणखी एक बदल सफारी जाऊन लष्करी साधर्म्य असलेला पोशाख निश्चित

भाजपाप्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील काही वर्षांपासून दिल्लीतील कधी रस्त्याचे नाव बदल तर कधी पाठ्यपुस्तकातून प्रमाणित इतिहास बदल, तर कधी गुलामीचे प्रतिक म्हणून संसद बदल असे अतार्किक निर्णय घेण्याचा सपाटाचा लावला. त्यातच आज संसदेत मागील ७५ वर्षापासून असलेल्या मार्शल्स अर्थात सुरक्षा अधिकाऱ्यांचा ड्रेसकोड अर्थात पोषाख बदलत त्यांना …

Read More »

अखेर मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी पोलिस अधिकारी निलंबितः शासन निर्णय जारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी राजीनाम्याऐवजी अधिकाऱ्यांचे निलंबन

जालना येथील आंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्यात येत होते. मात्र त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्या करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने केली होती. त्यानुसार जालनाच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना अखेर आज निलंबति केल्याचा शासन निर्णय राज्य सरकारने आज …

Read More »

पीएम किसानचा १५ वा हप्ता हवाय?, हे काम करा केंद्र सरकारच्या सूचना

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. आतापर्यंत १४ हप्त्यांमध्ये लाभ मिळाला आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. तुम्हाला प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये मिळतात. दर ४ महिन्यांनी एक हप्ता जारी केला जातो. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले भाजपा सरकारचा अन्यायी, अत्याचारी कारभार घराघरात पोहचवा

काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते पण भाजपाच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत असे केंद्र सरकार म्हणत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले, सरकारच्यामते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही आणि …

Read More »

मराठा आरक्षण इतिहास मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेला लेख

प्रस्तावना भारतीय समाजातील शोषण, विषमता व ब्राम्हणवाद लक्षात घेऊन सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वहारा वंचित समाजाला प्रत्येक ठिकाणी हक्काचे आरक्षण मिळावे अशी मागणी सरकारकडे केली होती . इंग्रजांनी सन १८७२ पासून आय सी एस परिक्षा सुरू केल्या होत्या . जगातील पहिले ५०% आरक्षण राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ मध्ये …

Read More »