Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ? शेतकरी आत्महत्येवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तर तब्बल ४४ दिवस ओढ दिली. परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि …

Read More »

मुंबईतील भूखंड दत्तक तत्वावर देण्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध शैलेश गांधी, अनिल गलगली यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक

मुंबई महापालिकेने काळजीवाहू, दत्तक तत्त्वावर दीर्घ मुदतीसाठी व दत्तक तत्त्वावर ११ महिन्यांसाठी भूखंड देण्यासाठी तयार केलेल्या मसुद्याबाबत रविवारी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या सांताक्रूझ निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत नवीन मसुद्याचा विरोध करत पालिकेने जमीन राखून ठेवत त्याची देखरेख करण्यावर सर्वानुमते ठरविण्यात आले आणि …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी या ३ योजना सर्वोत्तम, दरमहा २० हजार रुपये कमावण्याची संधी बँका आणि सरकारच्या काही योजना फक्त तुमच्यासाठी

तुम्ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधतात. बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला करामध्ये सूटही …

Read More »

आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, गोल्ड बाँडची दुसरी मालिका खुली दुसरी मालिका ११ सप्टेंबरपासून सुरु

आजपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून स्वस्त सोने खरेदी संधी आरबीआयने उपलब्ध करून दिली आहे. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२४ ची दुसरी मालिका सोमवारपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. यावेळी सोन्याचा भाव प्रति १ ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन आणि …

Read More »

शेअर बाजारात गुंचवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी खिशात पैसे ठेवा, या आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सहा आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आताच पैशांची व्यवस्था करा. चावडा इन्फ्रा आयपीओ गुजरातस्थित चावडा इन्फ्राचा आयपीओ १२ सप्टेंबर …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च …

Read More »

टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक

आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (१० सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एका निवेदनात …

Read More »

साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल हिंसक जमावाने घरे पेटवली

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समूहावर महापुरुषांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री ९.३० च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, …

Read More »