Breaking News

रामदास आठवले यांची ग्वाही, आंतरजातीय विवाह योजनेतील जाचक अट शिथील करणार

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी यासंदर्भात असणारी हिंदू विवाह कायद्याचीम अट शिथिल करण्यासाठी प्रयन्त करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाने …

Read More »

वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारतांना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र, …

Read More »

ऋतुजा लटके यांनी आयुक्तांची भेट घेत केली विचारणा, शिवसेना न्यायालयात

राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेकरीता पोट निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संभावित उमेदवार ऋुतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी मुंबई महारपालिकेतील नोकरीचा राजीनामा देऊनही त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर न करण्यात …

Read More »

राज्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये न्यायालये स्थापनार आणि नोकर भरतीही

माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येवून २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, त्यांचा कारभार फक्त एक वर्षाचा…

महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भुदरगड, …

Read More »

भाजपा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी, नाना तुम्ही मशालीची चिंता करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंडाळी ही भाजपाप्रणितच…

हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपाप्रणितच होती असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला. …

Read More »

संजय राऊत यांचे आईला भावनिक पत्र, महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही

पत्रावाला चाळ पुर्नवसन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांसमोर झुकू शकत नाही असे सांगत जशी तु माझी आई आहेस तशी शिवसेना सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता अशी भावनिक साद …

Read More »

राज्यात होणार एलएनजी गॅसपासून वीजनिर्मिती

राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज किंग्ज् गॅस कंपनीसोबत राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरण प्रकल्पात राबविला जाणार आहे. लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ …

Read More »

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू

मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी …

Read More »