अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवड प्रक्रिया जाहिर केली. त्यातच शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेत वेगळी चुल मांडली. त्यातच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून …
Read More »राज ठाकरे म्हणाले, तुम्हालाच खुर्चीवर बसवेन पण मी नाही…
मागील काही महिन्यापासून मनसे आणि भाजपा युती करणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु असून यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस रात्र काम केले पाहिजे असे सांगत मी तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार असून विधानसभेत, लोकसभेत सत्तेत बसवेन. तसेच त्या …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात लढत होत असून येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे नवीन चिन्ह धारण करण्यास मान्यता दिल्यांनंतर भाजपाने यावर टीका करीत या घडामोडींना भाजपा जबाबदार नसल्याचे सांगतानाच पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव …
Read More »अखेर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदेश जारी
अंधेरी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात व्हाया केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत पोहोचला. त्यावर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने या वादावर अंतरिम आदेश देत उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास परवानगी देत मशाल हे चिन्ह दिले. एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव
मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा …
Read More »राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची …
Read More »आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत
सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई …
Read More »गायीवरून सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अशा याचिका दाखल का करता? याचिका कर्त्याला फटकारले न्यायालयाने
गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेमध्ये गायींचं संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती एस. एस. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी भारत सरकारसाठी गायींची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असल्याचा …
Read More »केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालय दालनात मंत्री सत्तार यांनी केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या विविध कृषी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, नानाजी …
Read More »
Marathi e-Batmya