कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …
Read More »गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्री बी नागेंद्र यांचा राजीनामा दलित असल्याने विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा केला आरोप
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपकडून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी संध्याकाळी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा करताना अश्रू ढाळले. आपला निर्णय जाहीर करताना नागेंद्र यांनी दावा केला की, ते दलित असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्री बी नागेंद्र पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मिकी व्यवहारात …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप, कर्नाटकने दोन शिक्षकांना आरएसएससोबत असल्याने केले निलंबित बेपत्ता आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांचा शोध घेण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याता दिला सल्ला
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी कर्नाटक सरकारवर आरएसएसच्या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोन सरकारी शाळेतील शिक्षकांना निलंबित करून ‘द्वेषाने’ काम करत असल्याचा आरोप केला आणि ही कारवाई मागे घेण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डी के शिवकुमार सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कर्नाटक लोकसेवा आयोगातील मोठ्या …
Read More »नेपाळने भारत, चीन आणि अमेरिके सारख्या देशांची मदत नाकारली परदेशी शोध आणि बचाव मदतीच्या प्रस्तावांना नकार दिला
भोटे कोसी येथील विनाशकारी पुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोध आणि बचावासाठी हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षित पथके तैनात करण्याच्या भारत, चीन आणि इतर अनेक देशांच्या प्रस्तावांना नेपाळने नकार दिला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हटले आहे की, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा बचाव कार्य करण्यास सक्षम आहेत आणि शेकडो बेपत्ता परदेशी नागरिकांशी …
Read More »नेपाळच्या पुरात आतापर्यंत ५६७ जणांचा मृत्यू १५०० नागरिक अद्यापही बेपत्ता नेपाळ तिबेट सीमेवर नव्याने तयार झालेल्या सरोवर ओसडूंन वाहु लागल्याने पुन्हा पुराचा धोका
नेपाळमधील विनाशकारी अचानक आलेल्या पुरानंतर वाचलेल्यांना शोधण्याच्या धडपडीत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे, कारण नेपाळ-तिबेट सीमेजवळ नव्याने तयार झालेले सरोवर ओसंडून वाहू लागले आहे आणि त्यामुळे दुसऱ्या प्राणघातक लाटेचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी मध्य नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर किमान ५८७ लोकांचा मृत्यू झाला आहे …
Read More »सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र “बिलॉंन्गिंगः…” प्रसिद्ध करण्यास पेग्विंनचा नकार पुस्तकात काही बदल करण्यास आणि काही भाग वगळण्यास नकार दिल्याने पेंग्विनचा नकार
प्रकाशकाने सुचवलेले संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्याची विनंती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी फेटाळल्यामुळे ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने त्यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्यांचे कंपनीने खंडन केले आहे. शनिवारी आपल्या ‘एक्स’ (X) पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले की ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ …
Read More »पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व; नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची तरतूद
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता व नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या नियमांनुसार पंचायत समितीमध्ये नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या सदस्यांची संख्या संबंधित पंचायत समितीच्या एकूण निर्वाचित सदस्यसंख्येच्या …
Read More »गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना
नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती …
Read More »अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती
जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत …
Read More »
Marathi e-Batmya