सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्य प्रदेश राज्य जसं सर्वोच्च न्यायालयात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत …
Read More »बीडीडी चाळीतील पोलीसांना बांधकाम दराने मिळणार घरे पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नायगाव, एन एम जोशी आणि वरळी येथील बिडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन २०११ च्या आधिपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलीसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने ही घरे देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी , …
Read More »महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी …
Read More »नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलेल्या अनेक समस्यांचे निराकरण …
Read More »सरकार म्हणते राज्यात कोरोनामुळे १.४७ लाख मृत्यू मात्र दावे १. ८३ लाख मंजूर, नेमका आकडा किती? १ लाख ८३ हजार ३७५ मृतांच्या वारसांना सरकारी मदत
कोरोना मृत्यु लपवल्याबद्दल केंद्रातले मोदी सरकार आणि गुजरात राज्य सरकार मोठे बदनाम झालेले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा कोरोना मृत्यु लपवल्याची माहिती सरकारच्याच आकडेवारीतून उघड झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोरोना बळी लपवलेले नाहीत हा दावा पूर्ण खोटा पडला आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात ७८ लाख ८१ …
Read More »केतकी चितळेला मिळाली न्यायालयीन कोठडी, मात्र दोन ठिकाणचे पोलिस घेणार ताबा सध्या गोरेगांव पोलिसांच्या ताब्यात नंतर पिंपरी चिंचवड आणि देहू रोड पोलिस घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंदवित अटक केली. सुरूवातीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज ठाणे न्यायालयाने सुनावली. मात्र गोरेगांव पोलिस ठाण्यातही चितळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने गोरेगांव …
Read More »माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने सोडून दिले तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरूंगाबाहेर येणार
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लिट्टेच्या आत्मघातकी पथकाने बॉम्बस्फोट घडवून आणत जीवे मारले. त्यावेळी राजीव गांधी यांच्या मृतदेहाचे इतक्या चिंधड्या उडाल्या होत्या की, त्यांच्या शरीराचे अवयव शोधावे लागले होते. या कटातील एक आरोपी ए जी पेरारिवलन यास आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोडून देण्याचा निकाल दिला. त्यामुळे ३१ …
Read More »शीना बोरा प्रकरण; इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षानंतर जामीन सर्वोच्च न्यायालयाने केला मंजूर
प्रसिध्द अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी या गेल्या साडे सहा वर्षांपासून कारागृहात आहेत. आतापर्यंत त्यांचा अनेकदा केलेला जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. मात्र आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, ओबीसी आरक्षणप्रश्नी मध्य प्रदेशात चार दिवसात काय चमत्कार घडला? केंद्र सरकारने तर मध्य प्रदेश सरकारला इम्पिरीकल डेटा दिला नाही ना ?
ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना केल्या होत्या त्याच सुचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या, मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला की, मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निडणुका …
Read More »चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केली मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ …
Read More »
Marathi e-Batmya