Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा खून मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे आदेश

मध्य प्रदेश राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर निर्णय घेताना त्या सरकारने सादर केलेल्या सुधारीत अहवालास मान्यता देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी करत त्याच आधारे राज्यातील निवडणूकाही आरक्षणासह होतील असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात ओबीसी …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहित निवडणुका महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल

आज सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्यप्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही मंडळी न्यायालयात गेली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल …

Read More »

न्यायालयाने निकाल फिरविला; आरक्षणासह निवडणूका घ्या, मध्य प्रदेशला आदेश पण ५० टक्क्यांपेक्षा टक्केपेक्षा जास्त असू नये

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे मध्य प्रदेश सरकारला १० मे रोजी दिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश स्वतःच फिरवत आता आरक्षणासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. तसेच सदरचे आरक्षण ५० टक्के पेक्षा जास्त नसावे असेही स्पष्ट केले. त्यामुळे मध्य प्रदेशातील निवडणूका ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही महिन्यांपूर्वी …

Read More »

‘रेरा’ आधी सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य नैना' क्षेत्रातील टाऊन प्लॅनिंग स्किममध्ये सहभागी शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड मिळणार

नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रात (‘नैना’) वेगाने वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी या इमारतींचे रेरा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी त्यांना सिडकोची मान्यता तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ‘नैना’ क्षेत्रात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना रोखण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच ‘नैना’ क्षेत्रातील भूखंडावर आकारण्यात येणारे विकास शुल्क शेवटच्या घटकाकडून …

Read More »

सिडको प्राधिकरणाशी संबंधित “हे” मोठे निर्णय मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय

नवी मुंबईतील सिडकोच्या २२.०५ टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना भरावयाचे सुविधा शुल्क विकासकांना चार समान हप्त्यात देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना बांधकाम मुदतवाढीचा ना हरकत दाखला घेण्यासाठी दरवेळी वेगळा अर्ज न करता एकाचवेळी अर्ज करून तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकाम …

Read More »

पुण्यातील राड्यानंतर फडणवीस म्हणाले, हे सगळं तोऱ्यात होत आहे राज्यातील भाजपाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर टीका

काल सोमवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. त्यातच यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करतानाचे दृष्य पुढे आले. त्यानंतर या राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले …

Read More »

घाऊक महागाईच्या दराने गाठला विक्रमी टप्पा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक

कोरोना कालावधीनंतर सातत्याने देशात महागाई सातत्याने वाढत आहे. बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच आता जीवनाश्वक वस्तुंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे काही वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. तर काही वस्तुंच्या किंमती आहे तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या आकारमानात वजनात कंपन्यांनी घट केली आहे. …

Read More »

ज्ञानवापी मस्जिदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय, ते ठिकाण फक्त… मुस्लिम समुदायांना प्रार्थनेसाठी येण्या-जाण्यास परवानगी द्या

वाराणसी येथील ज्ञानवापी मस्जिदीच्या सर्व्हेक्षण प्रकरणी मुस्लिम समुदायाने उच्च न्यायालयात धाव घेत सर्व्हेक्षणाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम समुदायाची मागणी फेटाळून लावत म्हणाले, की जे शिवलिंग सापडले आहे. तेवढे संरक्षित करा आणि मुस्लिम समुदायाला प्रार्थनेसाठी येण्या-जाण्यास परवानगी द्या असे निर्देश दिले. त्यामुळे हा विषय आणखीनच चिघळला. …

Read More »

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दंत क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार : वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणाले, निवडणूक घेणार पण… निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्याआधी हवामान खाते आणि प्रशासकिय यंत्रणांचे मत विचारात घेणार

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत ज्या भागात पाऊसाचे प्रमाण कमी असेल किंवा पाऊस पडण्यास अवकाश असेल त्या भागात निवडणूका घेवू शकता अशी सूचना राज्य निवडणूका आयोगास केली. यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या वार्ड आणि प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण …

Read More »