Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर चितळेप्रकरणी सदाभाऊ खोतांची सारवासारव आधी अभिमान असल्याचे वक्तव्य केले नंतर मात्र मी तिच्या त्या पोस्टचे समर्थन नाही

भाजपा पुरस्कृत माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीला केतकी चितळे हिचा अभिमान वाटतो असे जोरदार वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात घुसून खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यानंतर मात्र त्यांनी सारवा सारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून आले. हा प्रकार …

Read More »

उखाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात लवकरच मान्सून: फक्त पाच दिवस बाकी १५ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाची शक्यता

मागील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतात तापमानात वाढ झालेली असल्याने उन्हाच्या रखरखीने राज्यातील जनतेला चांगलेच हैराण करून सोडले. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर वातावरणात थोडासा गारवा निर्माण व्हावा यासाठी मान्सूनच्या सरी कधी कोसळतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असताना मान्सूनने अंदमानच्या बेटावर आपली हजेरी …

Read More »

नाना पटोलेंच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले, फार महत्व देण्याचे कारण नाही काँग्रेस श्रेष्ठींकडे केली पटोलेंनी तक्रार

विदर्भातील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला डावलून भाजपाशी हात मिळवित सत्ता हस्तगत केली. याप्रकरणावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, त्यावेळी फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजायचे आता… मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर निशाणा

हा काळ इतिहास जमा होईल तेव्हा होईल पण या पुस्तकाच्या प्रति आजच काही जणांना घरी पाठवल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये सर्व प्रार्थनास्थळे बंद होती आणि फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजायला लागत आहेत अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंसह विरोधकांवर करत म्हणाले …

Read More »

ज्ञानवापी मस्जिदीचा सर्व्हेक्षण अहवाल देण्याआधीच हिंदू समाजाच्या वकीलाने केला “हा” दावा न्यायालयाच्या निर्णया आधीच दावा केल्याने मुस्लिम समुदायांकडून सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

वारासणीमधील ज्ञानवापी मस्जिद ही पूर्वीचे हिंदू मंदिर असल्याचा दावा करत वाराणसी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. त्यावर अखेर न्यायालयाने ज्ञानवापी मस्जिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन ते तीन दिवस चित्रीकरणाद्वारे सर्व्हेक्षण आज सोमवारी शांततेत पूर्ण करण्यात आले. या चित्रीकरणाचा अहवाल न्यायालयात सादर होऊन न्यायालयाचा निकाल हाती येण्यापूर्वीच हिंदू …

Read More »

अजित पवार म्हणाले, पंतसंस्थांमधील ठेवींनाही ५ लाखांपर्यत लवकरच संरक्षण सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. संस्था चालविणाऱ्या …

Read More »

फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर, मास्टर नव्हे ती तर लाफ्टर सभा; तुम्ही कशात होते? होय मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा मी नगरसेवक झालो होतो पण तुम्ही कुठल्या सहलीला गेलता

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत अयोध्येत काय सहलीला गेला होतात का? असा सवाल केला होता. त्यास आज भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, कालची सभा ही मास्टर सभा आहे म्हणून सांगण्यात येत होते. मात्र …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, कालची ती सभा म्हणजे थू चाट होती भाजपाच्या उत्तर भारतीय संमेलनात केली टीका

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-संकुल येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपासह राणा दांमप्त आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाच्यावतीने गोरेगांव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित उत्तर भारतीय संमेलन सभेत भाजपाकडून चांगलेच उत्तर दिले. यावेळी बोलताना भाजपाचे आमदार अॅड …

Read More »

लक्ष्य सेन, चिराग, सात्विक, किदांबीने १४ वेळचा इंडोनेशियाचा इतिहास मोडला पहिल्यांदाच भारताला बॅडमिटनमध्ये थॉमस कप

थॉमस कप स्पर्धेत १४ वेळा विजेते पटकाविणाऱ्या इंडोनेशियाच्या खेळाडूंना एकेरी आणि दुहेरी अशा तीन बॅडमिटन स्पर्धेत पराभूत करत पहिल्यांदाच लक्ष्य सेन, सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि किदांबी यांनी विजय मिळवित भारताच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला. त्यामुळे इंडोनेशियाच्या ताकदवर खेळाडूंना पराभूत करत एकप्रकारे इतिहासही घडविला आहे. भारताने रविवारी सलग तिसऱ्या सामन्यात …

Read More »

चितळे प्रकरणावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या; कुठल्या संस्कृतीत हे बसतं? फडणवीस, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अंत्यत हिन भाषेतील एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केल्याप्रकरणी तीला काल ठाणे पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिला १८ तारखेपर्यत पोलिस कोठडी दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कायदा योग्य ते …

Read More »