Breaking News

फायनान्स कंपन्यांच्या धमकाविणाऱ्या वसुली एजंटांवर कारवाई गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे आश्वासन

कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी पतपेढ्या, बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना हप्ते न भरल्यामुळे दमदाटी करीत शिवीगाळ करून धमकावलं जाते. कर्जावर घेतलेल्या वाहनाची परस्पर विक्री केली जाते. तर नेमलेले वसूली एजंट जिवे मारण्याच्या धमक्या देतात. अशा पद्धतीने कारवाई करण्याऱ्या वसूली एजंटावर प्रचलित कायद्या नुसार कारवाई करता येईल. मात्र सभागृहात व्यक्त केलेल्या सदस्यांच्या भावनांचा विचार करून गृहखात्याची बैठक …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची घोषणा, ३०० आमदारांना मुंबईत हक्काची घरे चाळींना शरद पवार, स्व.बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांची नावे बीडीडी चाळींना

मुंबई महानगरातील आमदार सोडून राज्याच्या ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत हक्काची घरे देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला असून ही घरे गोरेगांव येथे देण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडाच्याच ताब्यात असून तो प्लॉटही म्हाडाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही घरे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमदारांना देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी …

Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र, केली “ही” मागणी महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी

राजस्थान व छत्तिसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी असून राज्य सरकारकडे त्यांनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. राज्य सरकारने आता वेळ न घालवता त्यांच्या मागणीचा विचार करून निर्णय घेऊन त्यांना …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य आता काँग्रेस मंत्र्यांच्या हाती कोल्हापूर जागेचा पराभव झाला तर प्रदेशाध्यक्ष बदलणार

शंकर जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक जारी झालेली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तरमध्ये आता काँग्रेस आणि भाजपामध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसचे मंत्री सतेज बंटी पाटील यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकेची झोड उठवित प्रचाराचा नारळ फोडला. परंतु …

Read More »

जनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा देणार का? भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल

स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे या कायद्याला आमचा पाठींबा असल्याचे आधीच स्पष्ट करत या विधेयकावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी जनतेला मराठीतून कामकाज करण्याची सक्ती आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा असा दुजाभाव करणा-या तरतुदी असल्याकडे लक्ष वेधत काही सुधारणा मराठी विधेयकात सुचविल्या. विधानसभेत आज महाराष्ट्र राज्यातील …

Read More »

राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये फक्त मराठीच विधानसभेत मराठी भाषा विधेयक मंजूर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपरिषदा आदींच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने मराठी राजभाषा विधेयक आज सकाळी विधानसभेच्या विशेष सत्रात मांडत ते एकमताने मंजूर ही करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकिय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरीता तरतूद करण्यासाठी विधेयक मराठी भाषा मंत्री …

Read More »

सामाजिक न्याया विभागाकडून पंचतारांकित शाळा सुरु करणारः विभागाचा निधी वाढवा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात २०११ च्या जणगणनेनुसार जवळपास ११ टक्के मागासवर्गिय जनता विविध योजनांच्या लाभासाठी पात्र आहे. त्यामुळे सध्या असलेल्या आर्थिक निधीत वाढ करण्याची गरज असून यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देत औरंगाबादेत ११ एकर जागेत पंचतारांकित शाळा सुरु करण्यात येणार असून …

Read More »

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, दर महिन्याला निवडणूका… साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा निकाल लागत पाच पैकी चार राज्यात भाजपाने पूर्ण बहुमताने सरकारे स्थापन केली. त्यानंतर केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात एकदम २५ रूपये तर डिझेलच्या १० रूपये तर पेट्रोलच्या दरात ८० पैशाने वाढ केली. त्यामुळे आधीच कोरोना संसर्ग रोखण्याच्या नावाखाली लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेचे या दरवाढीमुळे …

Read More »

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेच्या लाभासाठी उत्पन्न मर्यादा वाढविणार उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी बैठक घेणार- धनंजय मुंडे

राज्यातील निराधार व्यक्तींना विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत देण्यात येत असलेल्या ५ प्रकारच्या निवृत्तीवेतन योजनेच्या लाभासाठीची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय ही मर्यादा वाढविल्यानंतर लाभार्थी संख्या वाढणार असल्याने परिणामी आर्थिक भार देखील वाढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर भेटून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय …

Read More »

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचे काय झाले ? देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव- नाना पटोले

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या दररोज आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का ? असा प्रतिप्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »