Breaking News

शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या प्रचारसभेतून उत्तर युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण

युक्रेनच्या विरोधात रशियाने सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात केंद्र सरकारला अपयश येताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत असल्याच्या यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यांबरोबर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी …

Read More »

१५ विमानातून २ हजार ९०० विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी आणले परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या विरोधात सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थी आणि नागरीकांना भारतात आणण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, …

Read More »

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …

Read More »

राज्यपालांवरील शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिले “हे” उत्तर राज्यपाल हटाव मोहिमच दिसतेय

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत आहे. मात्र हा संघर्ष दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी या ना त्या कारणाने या भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय …

Read More »

सुरज जाधव याच्या आत्महत्येतून ऊर्जा मंत्रालय धडा घेणार का ? आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्यांने शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा येणार नाही असे म्हणत आपलं जीवन संपवले. या दुर्घटनेनंतर भाजपा आमदार तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागावर टीका करत वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा …

Read More »

युक्रेन-रशिया युध्दाच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले,… यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्रास पुण्यातील कार्यक्रमाबरोबरच युक्रेनमधील विद्यार्थ्यांची सोडवणूकही महत्त्वाची - शरद पवार

पुण्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प येत असून उदघाटनाचे कार्यक्रमही होत आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच देशाची सुत्रे ज्यांच्याकडे आहेत, ते याची गांभीर्याने दखल घेतात का? हा महत्वाचा सवाल आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडले. …

Read More »

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? बेकायदेशीर फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावर तातडीने कारवाई करा

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी करत रश्मी …

Read More »

दिशा सालियन प्रकरणी पोलिस चौकशीला गेल्यानंतर नितेश राणेंनी केले “हे” ट्विट खेल आपने शुरू केला खत्म करेंगे असे सांगत ठाकरे सरकारला इशारा

दिशा सालियन प्रकरणी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिशाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी आज बोलावले. तेव्हा नितेश राणे यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत एकाच गाडीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे हे …

Read More »

मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शरद पवारांनी दिला नारायण राणेंचा दाखला चुकीच्या पध्दतीने व राजकीय हेतूने कारवाई, पण बाहेर आणण्यासाठी संघर्ष करत राहणार- शरद पवार

कुर्ला येथील जमिन खरेदीप्रकरणात तब्बल २० वर्षानंतर ईडीने कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. मलिक यांच्या अटकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी भाष्य केले. मात्र नवाब मलिक यांच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया …

Read More »

दिशा सालियनप्रकरणी न्यायालयाचा राणे पिता-पुत्रांना दिलासा १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही

सालियन कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे महिला आयोगाने दिलेल्या आदेशान्वये मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या गुन्ह्याच्या विरोधात राणे पिता-पुत्राने दिंडोशी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालये त्यांना १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही असे निर्देश देत संरक्षण …

Read More »