Breaking News

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी राजेश टोपे यांची मोठी घोषणा, चौकशी होणार सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवरून राज्याचे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडली असताना आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. पेपर फुटीवरून तब्बल दोन वेळा आरोग्य विभागाकडून परिक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे क आणि ड पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर …

Read More »

… तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना आव्हान

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हान त्यांनी अशोक …

Read More »

तर पंतप्रधानही संसदेत नसतात, त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या नोकरभरती घोटाळ्याची तार कुठपर्यंत आहे हे समजले पाहिजेः नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झालेले असताना राज्य सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्या सोपविण्याची मागणी केली. विरोधकांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतित्युर देत तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

विधानभवन परीसरातून….भाईंना पाहून नानांनी केली मान वाकडी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधातील असंतोष कारणीभूत ?

मराठी ई-बातम्या टीम विधानभवनाच्या मुख्य प्रवेशव्दारा शेजारी अंथरलेल्या ‘रेड कार्पोरेट’ वरून आमदार भाई जगताप आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी त्यांच्याकडे न पाहता थेट पायऱ्यांवर आले. यावरुन कॉग्रेसमध्ये मतभेद असल्याचे यावेळी दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे …

Read More »

परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी मलिक यांचा संबंध विधिमंडळ अधिवेशनात सिद्ध होईल भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये झालेले घोळ, गैरप्रकार हे सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादानेच घडले आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराशी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा असलेला संबंध विधिमंडळाच्या याच अधिवेशनात भाजपाचे लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी सिद्ध करतील, असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी दिला. भाजपा …

Read More »

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. समृद्ध भारत फाउंडेशनच्यावतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी राष्ट्रीय परिषद …

Read More »

सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला

मराठी ई-बातम्या टीम सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख …

Read More »

अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान,” तर खुशाल अविश्वासदर्शक ठराव आणावा” अध्यक्ष निवडणूकीवरून विरोधकांच्या आरोपाला दिले उत्तर

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्ष पदासाठी सरकार आवाजी मतदानाने निवडणूक घेत असल्याने सरकारमध्ये अविश्वास असल्याचे वाटत असेल तर विरोधकांनी खुशाल विधिमंडळात अविश्वासदर्शक ठराव आणावा आणि तो मंजूर करून दाखवावा असे खुले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले. विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षाची निवडीवरून …

Read More »

सरकारी चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर मुख्यमंत्री न फिरकल्याने आदित्य ठाकरेंनाच मंत्र्यांकडून विचारणा

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारापणामुळे सरकारच्या दैंनदिन कामकाजातून बाजूला झालेले आहेत. मात्र किमान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी प्रथा आणि परंपरेनुसार मुख्यमंत्री हे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राज्याचे आणि सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारी चहापानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण …

Read More »

माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? पेपरफुटी तपासावरून नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन …

Read More »