Breaking News

तीन काळे कृषी- कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात विरोधी पक्षांचा एल्गार झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

अकोले: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील …

Read More »

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »

संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू

पुणे : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील …

Read More »

कर भरत नसला तरी भरा आयटीआर, हे आहेत फायदे कर्ज, व्हिसा, पत्याचा पुरावा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर

मुंबई: प्रतिनिधी जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेत येत असेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक नाही. मात्र, आयटीआर दाखल केल्यास आपल्याला बरेच फायदे मिळतात. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणं फायदेशीर असेल. आयटीआर दाखल केल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया. कर्ज सहज मिळते आयटीआर …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, भाजपाचा सुर्य मावळणार नाही या भ्रमात होते पण… शेतकऱ्यांना 'साले' बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा - जयंत पाटील

जालना-भोकरदन: प्रतिनिधी मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजपनेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, “भारतात या, लस तयार करा” संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांनी मांडली देशाची बाजू

वृत्तसंस्था: प्रतिनिधी भारतात डिएनएवरील लस तयार करण्यात आली असून १२ वर्षावरील प्रत्येकाला ती देता येणार आहे. तर दुसरी एमआरएनए लस तयार होण्याच्या अंतिम टप्यावर असून कोरोनावरील आणखी एक लस जी नाकाद्वारे दिली जावू शकते त्यावरही भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन करण्याचे काम सुरु आहे. कोरोनावरील लसींचे वाटप पुन्हा गरजू देशांना देण्याचे काम …

Read More »

प्रविण दरेकरांचा आरोप आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची सीबीआय, सीआयडी अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

मुंबई: प्रतिनिधी न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. या एकमेव कंपनीला डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेचे कंत्राट देताना आपल्याच शासन निर्णयात वेळोवेळी सरकारने फेरबदल केले. न्यास कंपनीला काम मिळवुन देण्यासाठी अनेक वेळा शुध्दीपत्रक काढून निविदांमधील अटी व शर्थीमध्ये गैरलागू बदल केले, काही अटी शिथिल केल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या शासकीय भरतीतल्या महाघोटाळ्याचा …

Read More »

बार्टीचे हे ९ विद्यार्थी यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

बदली तर झाली पण महिना झाला तरी अधिकाऱ्यांना मंत्रालयात पोस्टींग मिळेना पोस्टींग मिळेना म्हणून अधिकारी जून्याच विभागात कार्यरत

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीमुळे  आणि कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सक्त आदेश बजावत बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूजू करावे असे स्पष्ट निर्देश दिलेले …

Read More »

भाजपाने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

जालना: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरियल डाटा देण्यास केंद्राने नकार दिला. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे हेही आवर्जून सांगतानाच ओबीसी …

Read More »