मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता नियोजित १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड …
Read More »मंत्री टोपे आणि वडेट्टीवारांच्या संकेताने जनतेत संभ्रमावस्था आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मदत व पुर्नवसन मंत्री वडेट्टीवारांचे संकेत
मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील वर्षभरापूर्वी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत सर्वसामान्य नागरीक सापडला आहे. त्यात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता पुन्हा कडक निर्बंध लागू केलेले असल्याने अप्रत्यक्ष रोजंदारी आणि हातावर पोट असणारे हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा राज्यात तीन आठवड्यांचा …
Read More »परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द
मुंबई : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे …
Read More »मुख्यमंत्री पंतप्रधानांना म्हणाले, कोविडमध्ये राजकारण आणू नका अशी समज द्या लसीकरणही करण्याची तयारी मात्र जादा लस पुरवठा, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स उपलब्ध करावेत
मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही …
Read More »जयंत पाटील फडणवीसांना म्हणाले, महाराष्ट्राचे नेते अन् महाराष्ट्राबरोबरच भांडताय ... अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा
मुंबई: प्रतिनिधी राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा… तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय… अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी …
Read More »लसीकरणप्रश्नी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांची भूमिका वेगळी पवार म्हणतात ते मदत करतायत तर मंत्री टोपे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणतात ते देतच नाही
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील लसीकरणाची अनेक केंद्र कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्याची पाळी आल्याची भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडत महाराष्ट्राला मागणी पेक्षा कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात येत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवरच थेट हल्ला चढविला …
Read More »फडणवीसांचा पलटवार, लोकांचे लक्ष हटविण्यासाठी लसीकरणावर राजकारण गैरकारभार आणि न्यायालयीन प्रकरणात वाभाडे
मुंबई: प्रतिनिधी विविध प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारची होत असलेली नाचक्की आणि स्वत:चा गैरकारभार या दोन्हींपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच कोरोना लसीकरणावर नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू आज व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी ! काँग्रेसचे 'कोरोनामुक्त महाराष्ट्र' अभियान; २४×७ हेल्पलाईन व जनजागृती मोहिम, रक्तदान शिबिरे- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, …
Read More »गुजरातला एक कोटी तर महाराष्ट्राला अवघे ७ लाख ५० हजार लसीचे डोस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली केंद्राची पोलखोल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ …
Read More »न्यायालयाचा शिक्कामोर्तब, देशमुखांवरील आरोपांची सीबीआयच चौकशी करणार अनिल देशमुख, राज्य सरकारची याचिका फेटाळली
नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेची आवश्यकता आहे. तसेच हे आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते दोघेही वजनदार व्यक्ती असून आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याने त्रयस्थ तपास यंत्रणेची गरज असून अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च …
Read More »
Marathi e-Batmya