राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ मात्र १५ जण बरे होण्याच्या मार्गावर ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्पाचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावीअसे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणारकोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत, ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक आहे. सध्या मुंबईपुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका असे आवाहन करत बाधीत रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका असा सल्लाही त्यांनी दिला. 

 राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेअसे आवाहनही त्यांनी केले. 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करा वैद्यकीय उपचारांच्या रुग्णांच्या मदतीसाठी दिले आदेश

राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *