सिद्धार्थने या व्यक्तीला दिलेल्या वचनामुळे आजही दारुच्या थेंबालाही करत नाही स्पर्श दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सिद्धार्थ ने सांगितलं कारण

आपल्या अभिनयामुळे नेहमीच कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. बेस्ट वसाहत मध्ये वाढलेला सिद्धार्थ आजही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतो

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने एका वृत्त समूहाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सांगितलं. सिद्धार्थचं त्याच्या कुटुंबियांवर किती प्रेम आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. विशेष म्हणजेच याच कुटुंबासाठी आणि खासकरुन आईच्या शब्दाखातर सिद्धार्थ आजही व्यसनांपासून दूर आहे.

“खूप असे दिग्गज कलाकार आहेत जे व्यसन करत नाहीत. मुळात ते केलंच पाहिजे असं काही नसतं. मी माझ्या आईला वचन दिलंय की दारुला कधी हात लावणार नाही, आत्महत्या करणार नाही,” असं सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थ जाधव यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी रत्नागिरी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे. सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातुन पुढे आला असून, त्याचे प्राथमिक शिक्षण शिवडी महापालिका मराठी शाळा आणि माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल, नायगाव दादर येथे झाले.

About Marathi E Batmya

Check Also

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *