डान्स गुरू रेमोचं असही व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट गावठी चित्रपटातलं गाणं केलं रसिकांना सर्मपित

मुंबई : प्रतिनिधी

व्हॅलेंटाइन डे एक दिवसावर येऊन ठेपल्याने सर्वत्र गुलाबी वातावरण आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करणारे हा दिवस कसा साजरा करायचा या तयारीत आहेत, तर याला विरोध करणारे या दिवशी घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा कसा घालायचा या विचारमंथनात व्यग्र आहेत. अशातच डान्स गुरू आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोझाने प्रेक्षकांना व्हॅलेंटाइन डेचं स्पेशल गिफ्ट दिलं आहे. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रेमोने रसिकांसाठी एक नजराणा सादर केला आहे. हा नजराणा म्हणजे आगामी ‘गावठी’ या चित्रपटातील एक रोमँटीक गाणं आहे. ‘दिसू लागलीस तू…’ हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेलं प्रेमगीत रेमोने व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून रसिकांना समर्पित केलं आहे.

‘गावठी’ चित्रपटाचे कोरीयोग्राफर, कथा लेखक तसेच दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) हे मागील पंधरा वर्षे रेमो डिसोजा यांचे सहायक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रेमगीताच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला रेमो आपल्या पत्नी लीझल यांच्यासोबत उपस्थित होता. गुरू रेमोच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणाऱ्या आनंदकुमार यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन, संगीत तसंच नृत्य दिग्दर्शन हे दिलखेचक असणार हे ओघाने आलेच. या प्रेमगीतासाठी एक स्पेशल सिग्नेचर डान्सस्टेप कोरीयोग्राफर आनंदकुमार यांनी चित्रीत केली आहे. या गीताचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील जे. डब्ल्यु. मॅरीएट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. श्रीकांत आणि योगिता या नवोदित जोडीने या सोहळ्यात ‘त्या’ प्रेमगीतावर बहारदार नृत्य सादर केलं. यावेळी रेमो डिसोजा आणि दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) यांनी न राहावल्याने स्टेजवर अचानक एंट्री घेत त्या स्पेशल डान्सस्टेप्सवर ताल धरला.

या सोहळ्यात उद्योजक किशोर गुलगुले व रेमो यांच्या हस्ते ‘गावठी’ चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी आर. बी. प्रोडक्शनचे निर्माते व कथा लेखक सिवाकुमार रामचंद्रन, चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, वंदना वाकनीस, संदिप गायकवाड, गौरव मोरे, सदानंद यादव, सिनेमॅटोग्राफर अजीत रेड्डी, संगीतकार अश्विन भंडारे – श्रेयस आंगणे, सिने व्यवसाय तज्ज्ञ कासम अली, पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दिक्षीत-ऋषिकेश भिरंगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

About Editor

Check Also

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही वांद्रे येथील फॅमिली कोर्टातून याचिका घेतली मागे

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *