अखेर रहस्यावरून पडदा बाजूला पदार्पणातच नेहा खान करणार शिकार

मुंबई : प्रतिनिधी

एप्रिलमध्ये हिट वाढणार या टॅगलाईनखाली येणाऱ्या विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाच्या टीझरने खरोखर हिट वाढवण्याचं काम सुरू केलं आहे. ‘शिकारी’ या चित्रपटाचा हॅाट टिझर मराठी सिनेसृष्टीत बोल्ड सिनेमांचं एक नवं पर्व सुरू होत असल्याची जणू चाहूलच देतोय की काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. आजवरच्या टीझरमध्ये ‘शिकारी’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची विविध अंगं दाखवत नायिकेचा चेहरा लपवण्यात येत होता; परंतु आता या रहस्यावरून पडदा उठला आहे.

‘शिकारी’मध्ये अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांची शिकार करणार आहे. नेहाच्या मादक अदा ‘शिकारी’च्या नवीन टीझरमध्ये पाहायला मिळतात. सनी लिओनीइतकी हॅाट नसले तरी आपणही तिच्यापेक्षा काही कमी नाही हे जणू नेहाने या टीझरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टीझरमधील नेहाच्या अदा पाहिल्यावर चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच तीदेखील प्रेक्षकांची शिकारच करायला सज्ज झालीय असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. या चित्रपटात नेमकं काय आहे? केवळ टीझरच बोल्ड बनवला आहे की पूर्ण सिनेमाच हॅाट आहे? यांसारखे बरेच प्रश्न ‘शिकारी’चा टीझर पाहिल्यावर पडल्याशिवाय राहात नाहीत.

महेश मांजरेकर मुव्हीजची प्रस्तुती आणि आर्यन ग्लोबल एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘शिकारी’ची निर्मिती विजय पाटील यांनी केली आहे. नेहा खानचा हा पहिलाच मराठी सिनेमा असून पदार्पणातच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्याची पूर्ण तयारी तिने केली आहे. विजू मानेसारख्या प्रयोगशील दिग्दर्शकाचं दिग्दर्शन आणि महेश मांजरेकरांसारख्या दिग्गज व्यक्तीमत्वाची प्रस्तुती यामुळे ‘शिकारी’ची चर्चा अधिक रंगू लागली आहे. सेक्स-कॅामेडी प्रकारात मोडणारा हा सिनेमा ठराविक वर्गातील प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवला असल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येतं. लवकरच प्रोमो आणि ट्रेलर्सच्या माध्यमातून ‘शिकारी’ची खरी झलक पाहायला मिळेल आणि त्यावरूनच ‘शिकारी’च्या माध्यमातून नेहा नेमकी कोणत्या वर्गातील प्रेक्षकांची शिकार करणार ते समजेल. २० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रकाशित होणार आहे.

About Editor

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *