“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली

मागील काही दिवसांपासून फुले चित्रपटाला ब्राम्हण समाजाच्या संघटनांकडून होत असलेल्य़ा विरोधाच्या पार्श्वभूमीवर फुले चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेतली

यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितले, प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचे सांगितले

दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्मात्या अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सह निर्माते रोहन गोडांबे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदीमध्ये हा चित्रपट येत आहे. त्यावर दिग्दर्शक आणि बाकी मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे असेही यावेळी सांगितले.

पुण्यातील ब्राम्हण समाजाच्या संघटनांकडून फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी भेट घेतल्याची घटना महत्वपूर्व मानण्यात येत आहे.

About Editor

Check Also

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही वांद्रे येथील फॅमिली कोर्टातून याचिका घेतली मागे

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *