पंतप्रधान मोदी यांचा दौराः अमेरिकन व्हिस्कीवरील सीमा शुल्कात ५० टक्क्याची कपात बर्बन व्हिस्कीच्या १५० टक्के असलेल्या सीमाशुल्कात ५० टक्क्यांची कपात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावणे अपेक्षित असताना त्यांना ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे साधे निमंत्रणही आले नाही. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर कर आकारणाऱ्या देशावर टेरिफ आकारण्याची घोषणा करत काही देशांवर टेरिफही आकारले. त्या पार्श्वभूमीवर भारतावरही टेरिफ आकरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकन दौरा निश्चित करण्यात आला. या दौऱ्यात अमेरिका आणि भारता दरम्यान व्यापार संबध आणखी दृढ करण्यासाठी लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त वस्तूंची खरेदी केल्यानंतर आज भारताच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर अमेरिकेच्या बर्बन व्हिस्कीवर सीमा शुल्कात ५० टक्के कर कपात करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

भारताने अमेरिकेसोबत मोठ्या व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केल्यामुळे बर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेच्या अगदी आधी १३ फेब्रुवारी रोजी बर्बन व्हिस्कीवरील सीमाशुल्कात कपात करण्याची सूचना देण्यात आली होती.

तथापि, इतर मद्यांच्या आयातीवरील मूलभूत सीमाशुल्कात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर १०० टक्के शुल्क यापुढे लागू राहणार आहे. अमेरिका हा भारतात आयात होणाऱ्या अशा सर्व मद्यांपैकी एक चतुर्थांश बर्बन व्हिस्कीचा प्रमुख निर्यातदार आहे.

महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बर्बन व्हिस्कीवर आता त्याच्या आयातीवर ५० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येईल. पूर्वी ते १५० टक्के होता. भारताने २०२३-२४ मध्ये २.५ दशलक्ष डॉलर्स किमतीची बर्बन व्हिस्की आयात केली आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये अमेरिका ($०.७५ दशलक्ष), युएई ($०.५४ दशलक्ष), सिंगापूर ($०.२८ दशलक्ष) आणि इटली ($०.२३ दशलक्ष) यांचा समावेश आहे.

भारत आणि अमेरिकेने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यापेक्षा ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे आणि शुल्क कमी करण्यासाठी आणि बाजारपेठेत प्रवेश वाढवण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय व्यापार कराराची योजना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली.

दरम्यान भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफबाबत बोलताना अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जो काही कर अर्थात टेरीफ भारत अमेरिकन वस्तुंवर आकारेल तितकाच टेरिफ भारतीय वस्तूंवर आकारणार असल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कार २०२६ साठी नोंदणी करण्याचे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त उद्या, २७ जून २०२६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *