कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला.

नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात ७०० रूपयांची कपात करत आता १२०० रूपये मोजावे लागणार आहे. तर रूग्णालयातून चाचणीसाठी सॅम्पल गोळा केल्यास पूर्वी २२ रूपये मोजावे लागत होते. आता त्यास १६०० रूपये निश्चित करण्यात आला आहे. घरी येवून सॅपल नेल्यास त्यास २५०० रूपये मोजावे लागत होते. आता फक्त २००० रूपये रूग्णांना द्यावे लागणार आहेत.

त्यामुळे आता रूग्णांच्या चाचणी खर्चात ५०० ते ७०० रूपयांची बचत होणार आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *