मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर मंत्री हसन मुश्रीफ वैद्यकीय यांनी घेतला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा

येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपसचिव अनिल आहेर, उपसचिव शंकर जाधव, उपसचिव तुषार पवार, उपसचिव श्वेतांबरी खडे, संचालक (आयुष) डॉ. रामण घोंगळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय कागल येथील अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील व शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सन २०२४-२५ पासून मुंबई आणि नाशिक येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेचे आणि अंबरनाथ (जिल्हा -ठाणे), गडचिरोली, हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, जालना आणि भंडारा या जिल्हयांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजनांबाबत पीएसयु PSU द्वारे होणाऱ्या बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, आजरा येथीय उत्तूर निसर्गोपचार महाविद्यालय संदर्भात आढावा घेण्यात आला. यंत्रसामुग्री निधी वितरण व पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच २०२४-२५ मधील विविध योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा देणार लाभ

महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *