मंत्री गुलाबराव पाटीलांच्या खाजगी सचिवाचा असाही पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी

मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.
कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानुषंगाने पाटील यांनी ही देणगी दिली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी म्हणून दिले.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *