कोकणनगर गोविंदा पथकाला विश्वविक्रमी १० थर लावल्याने २५ लाखांचे बक्षिस संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रताप सरनाईकांकडून २५ लाखाचे बक्षिस

दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन वर्तकनगर येथे करण्यात आले. या उत्सवात कोकणनगर दही हंडी पथकाने दहा थर लावले. आतापर्यंतची सर्वात जास्त थर लावत एक वेगळाच विक्रम स्थापित केला. त्यामुळे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखाचे बक्षिस कोकणनगर पथकास जाहिर केले. त्यानंतर पथकाच्या सदस्यांकडून एकच जल्लोष सुरु केला.

संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्यावतीने दरवर्षीप्रमाणे लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षिस तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल, याशिवाय जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास २५ लाखाचे बक्षिस जाहिर केले होते. या दहीहंडी उत्सवात ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख आणि आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार आणि सन्मान चिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह, तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकालाही विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहेत.

यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याशिवाय जागतिक विश्वविक्रम स्थापित करण्यात येणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाखाचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते. ही बक्षिसे जिंकण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. मुंबईतील कोकणनगर येथील गोविंदा पथकाने सुरुवातीलाच नऊ थराची यशस्वी सलामी दिली. यानंतर त्यांना १० थर लावण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर १० थर लावताच मैदानात एकच जल्लोष झाला. त्यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आनंद व्यक्त करत २५ लाखाचे बक्षिस मंडळाला जाहिर केले.

About Editor

Check Also

आशिष गुप्ता यांचे मत, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य

शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *