मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मॅको बॅंकेला प्रथम पुरस्कार

पगारदार सेवकांची बँक गटात सर्वोत्कृष्ट कार्य

 मुंबई : प्रतिनिधी

देशभरातील नागरी बँका तसेच पगारदारांच्या सहकारी बँकांना ‘एव्हीएस पब्लिकेशन’ तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या बॅंको पुरस्कार स्पर्धेत मंत्रालयातील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड ऑफिसेस को-ऑप बॅंक लि., मुंबई (मॅको बॅंक) ची प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली. या स्पर्धेतील ‘पगारदार सेवकांची बँक’ या गटात सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार मॅको बँकेला देऊन गौरवण्यात आले आहे.

या वर्षी झालेल्या स्पर्धेत देशभरातील नागरी बँका व पगारदारांच्या सहकारी बॅका यांनी घेतला होता. या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या दोन निवृत्त सहाय्यक व्यवस्थापक व नागरी बँकाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या परिक्षण समितीने “पगारदार सेवकांची बँक” या गटात सर्वोत्कृष्ट कार्यासाठी आपल्या बँकेला प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली आहे.

हा पुरस्कार १७ जानेवारी २०१९ रोजी “रेडीसन ब्लू रिसोर्ट, कर्जत” येथील सोहळ्यात बँकेचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण पंडित व संचालक कृष्णा मुकुंद कोयडे, संचालक सुलभा न. पोरे, संचालक (क.प्र.) भगवान पांडूरंग पाटील व समीर विठ्ठल तुळसकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद भास्कर महाजन यांनी स्वीकारला. बँकेच्या या यशात सर्व संचालक, अधिकारी,कर्मचारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचा मोठा वाटा आहे.

About Editor

Check Also

आयआयटी-मुंबईकडून साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्याची मागितली माफी कोणत्याही संचालकाचा राजीनामा नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल माफी मागितली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *