पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर सुधारीत कार्यक्रमानुसार १५ ते ३० एप्रिल कालावधीत होणार चाचणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता.परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.

आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७, कळंबोली येथे पार पडणार असून ती डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

About Editor

Check Also

आयआयटी-मुंबईकडून साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्याची मागितली माफी कोणत्याही संचालकाचा राजीनामा नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल माफी मागितली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *