रामदास आठवले यांचा इशारा, आनंदराज आंबेडकर यांनी पीईएसमध्ये लुडबुड करू नये बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा केला होता

पीईएस अर्थात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या ठरावा नूसार माझी चेअरमन पदी नेमणूक झालेली आहे. या ठरावा विरोधात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने काही लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता. यावर धर्मदाय आयुक्तांनी दोनवेळा भालचंद्र मुगणेकर आणि अशोक तळवटकर यांचा अर्ज फेटाळून लावला असून धर्मादाय आयुक्तांनी ४ फेब्रूवारी २०२१ च्या आदेशानुसार माझीच नेमणुक कायम केल्याचे पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रामदास आठवले यांनी आनंदराज आंबेडकर हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आता पिपल्स एज्युकेशन सोसायटीत लुजबुड न करता बाहेरून सहकार्य करावे अशी इशारेवजा सूचना केली.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ साली मागासप्रवर्ग तसेच इतर सर्व जातीधर्माच्या मुलांना उच्चशिक्षण घेता यावे याकरीता ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या संचालक मंडळात ७ सदस्य मागासप्रवर्ग आणि ४ सदस्य सवर्ण अशा प्रकारे सर्वसमावेशक भूमिका बाबासाहेबांची होती तीच भूमिका आम्ही कायम ठेवली असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना रामदास आठवले यांनी म्हणाले की, आपण स्थापन केलेल्या कोणत्याही संस्थेत माझ्या घराण्यातील व्यक्तींचा यामध्ये समावेश असता कामा नये ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर यांनी आम्हाला बाहेरून सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी केले.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतेवेळी जे ध्येय उद्दिष्ट सुनिश्चित केले होते. तेच साध्य करण्यासाठी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष या नात्याने मी कटीबध्द असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

आमचा पक्ष आहे आंबेडकरवादी, तुम्ही नका विचारू उमेदवारांची यादी

पक्ष महायुतीसोबत सत्तेत आहे, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत कोणकोणत्या जागा आपण लढविणार आहात असे विचारता रामदास आठवले यांनी आपल्या स्टाईल मध्ये काव्यात्मक उत्तर देत म्हणाले की, ‘आमचा पक्ष आहे आंबेडकरवादी तुम्ही विचारू नका उमेदवारांची यादी ‘ त्यांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये हास्य पसरले. मात्र महायुतीत आमच्यामुळे काही बाधा येणार नाही काही बिघाड होणार नाही असे काही आम्ही करणार नाही. तरीही आम्ही महायुतीतील भाजपानेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५ ते ७ जागांची मागणी केली. यामध्ये धारावी, चेंबुर, केज,श्रीरामपुर, पिंपरी, उत्तर नागपुर, देगलूर या जांगाची मागणी केल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *