शरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोट दुखीवर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना आज रविवारी पुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

त्यांच्यावर उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अगोदर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांची विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर १५ दिवसांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने त्यांना आज ब्रीच कँण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *